नाशिकचा मोटारसायकल चोर पारोळा पोलिसांच्या जाळ्यात pudhari photo
जळगाव

नाशिकचा मोटारसायकल चोर पारोळा पोलिसांच्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

जळगांव : मूळचा नाशिकच्या सातपूर येथील दुचाकीचोर जो नाशिकमध्ये दुचाकी चोरी करुन जळगाव जिल्ह्यात चोरीच्या दुचाकी कमी किमतीत विकायचा त्याला पारोळा तालुक्यातील तरवाडे येथे पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून 19 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

पारोळा तालुक्यातील आडगाव, तरवाडे, शिवरे व परिसरात कमी किमतीत दुचाकी विक्री होत असल्याची माहिती पारोळा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास मिळाली. पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी पारोळा पो.स्टे. च्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक राजु विठ्ठल जाधव, पोहेका प्रविण पाटील, पोना संदिप सातपुते, पोकों अभिजित पाटील यांना आरोपीच्या मागवा काढण्याचे सूचना दिल्या. संशयित आरोपी किशोर संजय चौधरी पारोळा तालुक्यातील तरवडे आणि हल्ली मुक्काम सातपूर नाशिक हा नाशिक शहरातुन व इतर परीसरातुन दुचाकी चोरुन त्या विकतो. तो पुन्हा चोरीची मोटार सायकल विक्री करण्यास पारोळा पो.स्टे. हद्दीत येणार आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यावरुन पथकाने पारोळा शहरातील कजगाव रोडवरील आकाश मॉल परिसरात किशोर संजय चौधरी यास पकडले. त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता संशयित आरोपी किशोर संजय चौधरी याने नाशिक शहर हद्दीतून व परिसरातुन मोटार सायकली चोरी केल्या असल्याची कबुली दिली. त्याचेकडुन चोरी केलेल्या १९ मोटार सायकली हस्तगत करुन जप्त करण्यात आल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT