जळगाव: रावेर तालुक्यातील मोरव्हाल परिसरामध्ये एका शेतकऱ्याने आपल्या तुरीच्या शेतामध्ये गांजाची शेती केली आहे. रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सदरील शेतावर छापा टाकून 2 एकर मधील 171 किलो वजनाच्या गांजाची शेती केली होती. जवळपास 17 लाखाच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रावेर पोलीस स्टेशनचे पो.नि. डॉ विशाल जयस्वाल यांना 9 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे ही कारवाई केली. रावेर तालुक्यातील मोरव्हाल आरोपी युसुफ अकबर तडवी (वय-50) याने आपल्या दोन एकरच्या शेतामध्ये दोन एकर शेतात तुरीचे पिकाचे मधोमध कैनबिस वनस्पती (गांजा) सदृश अंमली पदार्थाचे एकुन 171, वजनाची एकुन 172 लहान मोठी झाडांची लागवड करुन जोपासना केलेली आढळून आले. रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने दोन एकरातील 171 किलो वजनाची गांजाची शेती उध्दवस्त केली. पोलीसांनी व फॉस्सीक पथक यांनी पंचनामा करुन मुद्देमाल जागीच जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाचे बाजारभावाप्रमाणे अंदाजीत मुल्य 17 सतरा लाख रुपये इतके आहे.
सदर कारवाई ही पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर फैजपुर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रावेर पो.नि डॉ विशाल जयस्वाल, पोउपनिरी तुषार पाटील, पोउपनिरी मनोज महाजन, गुन्हे शोध पथकातील पोना कल्पेश आमोदकर, पोकों प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, भुषण सपकाळे, राहुल परदेशी, योगेश पाटील पाल दुरक्षेत्रचे पोहेकों ईश्वर चव्हाण, पोहेकाँ जगदीश पाटील, पोकों ईस्माईल तडवी, पोकों गजाजन बोणे, कुंदन नागमल चालक पोहेका गोपाळ पाटील अशांनी केली आहे.