जळगाव: पुढारी वृत्तसेवा : भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी येथे एका ४४ वर्षीय तरुणाचा बॅट मारून खून करण्यात आला. प्रदीप इंगळे (रा. टाईप थ्री, घर नंबर 44, वरणगाव फॅक्टरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. ही घटना आज (दि. ११) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलेले आहे.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासणीला सुरूवात केली. फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. पोलिसांनी दोन संशयित ताब्यात घेतलेले आहेत. या खूनामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. वरणगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.