जळगाव | राज्याचे संकट मोचक गिरीश महाजन यांच्यानंतर ज्यांच्या शब्दाला पक्षात व राज्यात वजन आहे व राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याविषयी स्वतः म्हणतात की त्यांचा शब्द म्हणजे गिरीश महाजन यांचा शब्द आणि गिरीश महाजन यांचा शब्द म्हणजे माझा शब्द असे मोठे नेते मंगेश चव्हाण सध्या चाळीसगाव पुरते मर्यादित राहिलेले आहेत. चाळीसगावची सीमा सुद्धा त्यांना ओलांडणे अवघड झालेले आहे.
जळगाव जिल्ह्यात जिल्हा बँक, दूध संघावर ज्याचे वर्चस्व तो जिल्ह्याचे नेतृत्व करतो असे एक सर्वसामान्य मानले जाते. मात्र जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे संकट मोचक यांच्यानंतर ज्यांच्या शब्दाला पक्षात व राज्यात वजन आहे व राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याविषयी स्वतः म्हणतात की त्यांचा शब्द म्हणजे गिरीश महाजन यांचा शब्द आणि गिरीश महाजन यांचा शब्द म्हणजे माझा शब्द असे मंगेश चव्हाण जे महायुतीच्या समन्वयकाच्या भूमिकेत असतानाही मात्र, चाळीगावच्या वेशीतच अडकल्याचे चित्र आहे.
युती चे समन्वयक म्हणून भूमिका बजावताना त्यांनी लोकसभेमध्ये संपूर्ण जळगाव, रावेर लोकसभा मतदारसंघात सहकार्य करत हिरेरीने भाग घेतला. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्हा युतीचे समन्वयक म्हणून भूमिका निभवतांना ते फक्त चाळीसगाव पुरते मर्यादित राहिलेले आहेत. मंगेश चव्हाण यांना चाळीसगावची शिव ओलांडणे सुद्धा कठीण झालेले आहे.
त्यामुळे युतीच्या उमेदवारांकडे लक्ष देणे व मतदारसंघात जाऊन समन्वययकाची भूमिका निभावणे सुद्धा दुरापास्त झालेले आहे. चाळीसगाव मतदार संघामध्ये मंगेश चव्हाण विरुद्ध उन्मेष पाटील अशी लढत आहे. एकेकाळी एकाच पक्षात व एकाच मतदारसंघाचे नेतृत्व त्यांनी केलेले होते. मात्र आज दोघेही युती व आघाडीच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे मंगेश चव्हाण हे जिल्ह्याचे दोन नंबरचे नेते झालेले असल्याने ते संपूर्ण लक्ष चाळीसगाव मध्ये देत असल्याने त्यांना चाळीसगावचे बाहेर जाणे सुद्धा कठीण झालेले आहे अशी अवस्था मंगेश चव्हाण यांची झालेली आहे.
जे मंगेश चव्हाण दूध संघाच्या वेळी मुक्ताईनगर मधून उभे राहून तेथून निवडून येतात ते या विधानसभेत निवडणुकीमध्ये स्वतःच्या मतदारसंघात मध्येच गुरफटलेले दिसत आहे. त्यामुळे चाळीसगाव मतदार संघामध्ये असलेल्या मराठा, बंजारा, अल्पसंख्यांक या समाजावर भिस्त ठरलेली आहे. दोघेही उमेदवार मराठा असल्याने मराठा मतदान चे विभाजन होणार हे तर नक्कीच त्यामुळे बंजारा व अल्पसंख्यांक समाज हा कोणाच्या बाजूने जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.