जळगाव : राज्यात गणेशोत्सवाचे औचित्य साधत मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते नागपूर दरम्यान सहा अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सव काळात मोठ्या प्रमाणात प्रवासी गावाकडे जाण्याची शक्यता लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
विशेष गाडी क्रमांक 02101 शुक्रवार ( दि. 22 ) ते शुक्रवार (दि. 5 सप्टेंबर) दरम्यान प्रत्येक शुक्रवार लोकमान्य टिळक टर्मिनसवरून पहाटे 00.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 13.40 वाजता नागपूर येथे पोहोचेल. (एकूण 3 फेऱ्या)
तर गाडी क्रमांक 02102 नागपूर येथून त्याच कालावधीत प्रत्येक शुक्रवार दुपारी 14.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5.00 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (एकूण 3 फेऱ्या)
थांबे असे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
रेल्वे डब्याची संरचना अशी : 1 वातानुकूलित द्वितीय श्रेणी, 6 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 9 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी, 1 आसन व्यवस्था तसेच गार्ड ब्रेक व्हॅन.
अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येणार असून, प्रवासासाठी सुपरफास्ट मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेलेच शुल्क आकारले जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेप्रशासनाकडून देण्यात आली आहे.