जळगाव

Lok Sabha Election Results 2024 Live| रावेर येथे सलग फेरीमध्ये रक्षा खडसेंनी घेतली आघाडी

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – रावेर लोकसभेच्या दुसऱ्या फेरीअंती 96 हजार 770 मतदान झालेले असून त्यापैकी 466 नोटा चा वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये रक्षा खडसे यांनी 19091 मतांनी आघाडी घेतलेली आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील अशी लढत होत आहे. आज मंगळवार (दि.४) रोजी मतमोजणीच्या दिवशी दुसऱ्या फेरीअंती 96 हजार 770 मतदान झालेले असून त्यापैकी 466 जणांनी नोटांचा वापर केलेला आहे. त्यामध्ये रक्षा खडसे यांना 48 हजार 816 तर श्रीराम पाटील यांना 29 हजार 725 मतदान झालेले आहे. यामध्ये दुसऱ्या फेरीअंती रक्षा खडसेंनी 19091 मतांनी आघाडी घेतलेली आहे.

रावेर लोकसभा

श्रीराम पाटील – 66382
रक्षा खडसे – 127243
60861 मतांनी रक्षा खडसे तिसऱ्या फेरी नंतर आघाडीवरच आहेत.

तर

जळगाव लोकसभा

करण पवार- 60756
स्मिता वाघ – 110366
49650 मतांनी स्मिता वाघ आघाडीवर आहेत.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT