जळगाव : भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन नागोशेठ पाटील (बडगुजर) यांचा मोठा मुलगा रोहन गजानन पाटील याची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या पदावर निवड झाली आहे.
रोहन गजानन पाटील हा जळगाव येथील पोलीस दलात कार्यरत असलेले खुशाल नागोशेठ पाटील यांचा पुतण्या आहे. त्याचे नवोदय विद्यालयात शिक्षण झाले असून त्याने पंजाब येथुन इंजिनिअरची पदवी घेतली आहे. त्यांनतर नुकतेच भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर त्याची निवड झाल्याने सर्व स्तरातून रोहनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या निवडीबद्दल गावाच्या वतीने व आप्तस्वकीयांमध्ये रोहनचे कौतुक होत आहे.