जळगाव : जळगाव जिल्ह्यात सोमवार (दि.28) रोजी संध्याकाळी अचानक नाकाबंदी व कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या विशेष मोहिमेत जिल्हाभरात विविध प्रकारच्या कारवाया राबविण्यात आल्या.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार संध्याकाळी 5.30 ते 8.30 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाचवेळी नाकाबंदी आणि कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी सहभागी होते.
दारूबंदी कायद्यानुसार : 56 केसेस
बेटिंग (जुगार) : 29 केसेस
एनडीपीएस (गांजा सेवन): 16 केसेस
NBW वॉरंट बजावणी: 41
बेलवॉरंट बजावणी: 19
एम.पो.का. केसेस (कलम 122): 2
रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी: 99
नाकाबंदी दरम्यान करण्यात आलेली कारवाई:
वाहन तपासणी: 1517 वाहने
मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई: 305 प्रकरणांमध्ये दंड
ड्रंक अँड ड्राईव्ह: 20 केसेस
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (जळगाव), आणि अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस प्रशासनाने सांगितले की, जळगाव जिल्ह्यात अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सातत्याने राबवण्यात येणार आहेत.