जळगाव : येथील महानगरपालिकेत जन्म प्रमाणपत्रसाठी दाखल तहसीलदारांची कागदपत्र सही व शिक्के हे खोटे असल्याचे निष्पन्न झाल्यावर 43 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये दोन वकिलांना अटक करण्यात आली. या प्रकरणात किरीट सोमय्या यांनी आज जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, तो तुझा आहे ना. सांग जर मालेगाव मध्ये चार हजार अर्ज आले. तर त्यांनी अधिकृत कागदपत्रे का दिली नाही. जर अधिकृत कागदपत्र नाही तर हा डायरेक्ट वरून आला आहे, त्याचे सर्टिफिकेट उद्धव ठाकरे यांनी आणि राहुल गांधींनी द्यावे असे आव्हान सुद्धा किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांना दिलं आहे.
बनावट कागदपत्र सादर करून जन्म प्रमाणपत्र घेतल्याच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यभरात आतापर्यंत 16 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. जन्म दाखले मिळवण्यासाठी जे दोन लाख 33 हजार अर्ज आले त्यापैकी 97 टक्के हे मुस्लिम आहेत आणि अनेकांची पार्श्वभूमी ही बांगलादेशी आहे.
दीड तास मी पोलिसांसोबत चर्चा केली. 5 हजार अर्ज आले त्यात केवळ 80 टक्के अर्जात केवळ आधार कार्ड म्हणून पुरावा दिला आहे. जळगाव बरोबरच भुसावळ सारखं सुद्धा शहर आहे की ज्या ठिकाणी 1 हजार अर्ज आले आहेत. या सर्व प्रकरणांची विभागाने चौकशी करावी. 80% मुस्लिमांकडे कुठलीही कागदपत्र नाहीत त्यामुळे याची चौकशी सुरू झाली आहे.
या प्रकरणांमध्ये वकिल आणि दलाल सुद्धा दिसतो आहे. मात्र या दोघांनी एवढीच प्रकरणे केली असतील असा अर्थ याचा होत नाही. यापेक्षा जास्त प्रकरणे केली असतील. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे आपल्याला काही काळ वाट पाहावी लागेल. 97% मुस्लिम आणि त्यातल्या त्यात त्यांची पार्श्वभूमी बांगलादेशी असल्यामुळे त्यामुळे स्वाभाव एकच लोकांच्या मनात शंकाही उपस्थित होते. एटीएस आणि NIA यंत्रणांसोबत माझी दिल्लीत जाऊन चर्चा झालेली आहे. योग्य वेळेला ते सुद्धा या चौकशीत सहभागी होणार आहेत असे सोमय्या म्हणाले.