जळगाव | लोकशाहीच्या चौथ्या स्तंभासाठी जळगाव येथे पत्रकार प्रीमियर लीग चे आयोजन तीर्थ मैदानावर 10 ते 12 फेब्रुवारी करण्यात आले आहे. ही स्पर्धा तीन दिवस चालणार आहे.
जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर 10 ते 12 फेब्रुवारी पत्रकार प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तीन दिवस चालणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक संघ यामध्ये सहभागी असणार आहे. याचबरोबर जळगाव शहरातील पाच लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन असे 24 संघ यामध्ये सहभागी होणार आहे. यामध्ये बक्षीस वितरणाच्या दिवशी ट्रॉफीसह हजारो रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
प्रत्येक तालुक्यातून 13 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. प्रत्येक सामना 8 षटकांचा असून टेनिस बॉल वर खेळला जाणार आहे.
प्रत्येक तालुक्याचा संघ हा त्या तालुक्याच्या नावाने त्यांना आयोजकांकडून जर्सी देण्यात येणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये चेतन वाणी, वाल्मिक जोशी, किशोर पाटील, जकी अहमद वसीम खान सचिन गोसावी यांनी दिली.