File Photo
जळगाव

Jalgoaon Accident | ट्रक-बोलेरो अपघातात तरूण ठार

ट्रक चालकावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जळगाव | जामनेर तालुक्यातील माळपिंप्री गावाजवळ भरधाव ट्रकने बोलेरो वाहनाला धडक दिल्याने २५ वर्षीय तरुण जागीच ठार झाला आहे. या प्रकरणी ४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता जामनेर पोलिसांत ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल श्रीराम गायकवाड वय २५ रा. पाळधी ता. जामनेर हा २७ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ०४ एचएस ६८६७ ने येत असताना समोरून येणारा ट्रक क्रमांक एमएच ४८ जेझिरो ०१०५bजोरदार धडक दिली. या धडकेत बोलेरो वाहनामधील चालक स्वप्निल गायकवाड हा जागीच ठार झाला असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भात जामनेर पोलीस ठाण्यात ट्रक चालक सुनील हिरालाल सोनवणे रा. खोटेनगर जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल उमेश चौधरी करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT