जळगाव : राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार राज्यातील दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.या तपासणीत जिल्हा परिषदेच्च्या ६ कर्मचाऱ्यांची निकषानुसार टक्केवारीत तफावत आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सहा कर्मचाऱ्याविरुद्ध शुक्रवार दि २३ जानेवारी रोजी निलंबनाची कारवाई केली आहे.
करनवाल यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. या पूर्वी देखील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली १३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.त्यामुळे आतापर्यंत निलंबित करण्यात आलेल्या कर्मचारी यांची संख्या १९ इतकी झाली आहे.
राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांग कर्मचारी यांची uid कार्ड तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.यात जळगाव जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनावर कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची देखील तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी दरम्यान दिव्यांग टक्केवारी तफावत आढळून आलेल्या कर्मचाऱ्याविरुध्द निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे.
त्यानुसार राजेश विजय खैरनार,आरोग्य सहाय्यक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय रावेर, प्रदीप बगडू ढाके, आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवद या.धरणगाव, अजय पुंडलिक शिरसाठ, प्राथमिक शिक्षक आव्हाने शाळा, ज्ञानेश्वर वेडू चौधरी, प्राथमिक शिक्षण सुनोदा जिल्हा परिषद शाळा, स्वप्नाली वाल्मिक पाटील, प्राथमिक शिक्षक पथराड ता धरणगाव, पंकजा मगनलाल वाघ, प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा नगाव ता पारोळा या सहा कर्मचाऱ्याविरुद्ध निलंबनाची कारवाई शुक्रवार दि २३ जानेवारी रोजी करण्यात आली आहे.