जळगाव

जळगाव: दहशत माजविण्यासाठी आलेला तरुण गावठी पिस्तूलसह अटकेत

अविनाश सुतार

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : भुसावळ येथे शरद पाण्याच्या टाकीजवळ हातात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या युवकाला बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस व एक मोबाईल जप्त केला. त्याला न्यायालयात हजर केले असता गुरूवारपर्यंत (दि. 19) पोलीस कोठडी सुनावली.

यापूर्वी भुसावळ व चोपड्यामध्ये मोठ्या प्रमाणात गावठी पिस्तूल जप्त करण्यात आल्या होत्या. आज बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गुप्त माहिती मिळाली की, एक अज्ञात व्यक्ती गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजवीत आहे. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, सुनील जोशी, विजय नेरकर, निलेश चौधरी, यासीन पिंजारी, महेश चौधरी, रमण सुरडकर, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, सचिन चौधरी, योगेश माळी यांनी शोध मोहीम राबवली.

यावेळी नाहाटा चौक पाण्याच्या टाकीजवळ आरोपी राहुल रामदास क्षीरसागर (वय 35, रा. फडके खानावळजवळ, अष्टभुजा हॉटेलच्या मागे भुसावळ) संशयितरित्या फिरता आढळून आला. त्याची झाडाझडती घेतली असता एक गावठी पिस्तूल मॅगझिनसह दोन जिवंत काडतूस, एक मोबाईल जप्त करण्यात आले. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नेरकर तपास करीत आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT