Record temperature  Pudhari File Photo
जळगाव

Jalgaon Temperature | जळगावकरांना उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा; दोन दिवसांत तापमान ३ अंशांनी घसरले

मुमराबाद वेधशाळेची नोंद: ४५ च्या वर गेलेला पारा ४२.४ अंशांवर

पुढारी वृत्तसेवा

Mercury drops in Jalgaon

जळगाव: काही दिवसांपासून जळगाव शहरात सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली होती. १४ मे रोजी पारा थेट ४५.६°C वर पोहोचल्याने जळगावकर होरपळून निघाले होते. मात्र, गेल्या ४८ तासांत तापमानात तब्बल ३ अंशांची घसरण झाली आहे. शनिवारी (दि.१६) कमाल तापमान ४२.४°C नोंदवले गेले. यामुळे जळगावकरांना उन्हाच्या तीव्र तडाख्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

स्थानिक मुमराबाद वेधशाळेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांतील तापमान

दिनांक

१४ मे

४५.६°Cकमाल तापमान

२८.८°Cकिमान तापमान

९३%हवेतील आर्द्रता

१५ मे

४५.३°Cकमाल तापमान

२८.९°C. किमान तापमान

८९%हवेतील आर्द्रता

१६ मे

४२.४°Cकमाल तापमान

२६.६°C. किमान तापमान

८९ % हवेतील आर्द्रता

१४ आणि १५ मे रोजी जळगाव जिल्हा उन्हाचे तीव्र चटके चटके जाणवत होते . १४ तारखेला हवेतील आर्द्रता ९३ टक्के एवढी राहिल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली होती आणि घामाच्या धारांमुळे नागरिक हैराण झाले होते.

शनिवारी (दि. १६) मे रोजी किमान तापमानातही घसरण होऊन ते २६.६°C वर आले आहे. कमाल तापमान ३ अंशांनी घसरून ४२.४°C वर आले. तरीही हवेतील आर्द्रता८९% कायम असल्याने उष्णतेचा तडाखा कमी झाला असला, तरी उकाड्याचा त्रास मात्र कमी झालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT