बाधित गावांना जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, अपर जिल्हाधिकारी श्री अंकुश पिनाटे यांनी भेट देऊन पाहणी केली pudhari news network
जळगाव

जळगाव : वाघूर नदीला पूर; जिल्हाधिकारी यांची बाधित गावांना भेट

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रातील अजिंठा पर्वतरांगातून मागील 2 दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आला आहे. जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरातील 4 गावांना पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेले आहे. बाधित गावांना जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, अपर जिल्हाधिकारी श्री अंकुश पिनाटे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच मदतकार्याची गती वाढविणेबाबत सूचना केल्या. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक (SDRF) नियुक्त करण्यात आलेले आहेत.

वाघूर नदीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व गावांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून पुराच्या पाण्याने जीवितहानी वा पशुधनाची हानी झालेली नाही मात्र वित्तहानी झालेली आहे. बाधित गावांत आवश्यक ती मदत करण्यासाठी तहसीलदार जामनेर घटनास्थळी उपस्थित असून नागरिकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येत आहे. मदतकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक (SDRF) ही मागविणेत आलेले असून त्यांच्याद्वारे आवश्यक मदतकार्य करण्यात येत आहे. जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा इ. ठिकाणीही मदतकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक (SDRF) नियुक्त करण्यात आलेले आहेr.

मदतीसाठी येथे संपर्क करावा

तापी व वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे हतनूर व वाघूर धरणातील पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार विसर्ग नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून नागरिकांनी तापी व वाघूर नदीपात्र परिसरात जाऊ नये तसेच पशुधनही सोबत नेऊ नये अशा सुचना करण्यात आल्या आहेत. आपातकालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष क्र. 02572217193 संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील विविध नदीपात्रांवर नागरिकांची सुरक्षा व मदतकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक मागविणते आले असून वाघूर नदीकाठावर पहूर, ता. जामनेर, तापी वाघूर संगम साकेगाव ता. भुसावळ, तापी नदीकाठावर चांगदेव ता. मुक्ताईनगर असे 3 पथके तैनात करण्यात आलेली आहेत.

गिरणा धरणातील जलसाठा सद्यस्थिती अशी...

2 वक्र दरवाजे उघडण्यात आले असून 2442 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

हतनूर धरणातील जलसाठा सद्यस्थिती अशी...

  • 18 दरवाजे उघडण्यात आले असून 99941 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

  • नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

वाघूर धरण

  • वॉटर लेवल : 233.400 मीटर

  • जिंवत पाणी साठा : 227.702मी मि

  • ग्रॉस स्टोरेज :- 304.441 मी मि

  • टक्केवारी : 91.61टक्के एकही दरवाजा उघडा नाही दहा मिलिमीटर पावसाची नोंद तर आजपर्यंतची पावसाची नोंद 846 मिलिमीटर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT