लखपती दिदी कार्यक्रमात बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी. (छाया : नरेंद्र पाटील)
जळगाव

जळगाव : महिलांवरील अत्याचार अक्षम्य पाप - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : देशातील महिलांना प्रतिभावंत व सुरक्षित ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. देशातील कोणत्याही राज्यात असो, महिलांविरुद्ध होत असलेला अपराध हा अक्षम्य पाप आहे. जो अपराधी आहे तो वाचला नाही पाहिजे. मग त्यामध्ये पोलीस असो, अधिकारी असो, राजकीय असो किंवा कोणी असो वरीष्ठ पातळीपासून तर सर्व स्तरापर्यंत हा मेसेज गेलाच पाहिजे की, महिलांवर होत असलेला अत्याचार त्या आरोपीला शिक्षा होणारच. देशातील प्रत्येक राज्याला आम्ही यासाठी आमचे संपूर्ण सहकार्य असणार आहे. यासाठी आम्ही भारतीय न्याय संहिता मध्ये बदल केलेले आहेत. तर अत्याचार करणाऱ्याला उमरखेड किंवा फाशीची शिक्षा ठेवली आहे असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदी कार्यक्रमावेळी बोलताना केले.

जळगाव येथील प्राईम इंडस्ट्रियल पार्क या ठिकाणी दुपारी 12.42 वाजेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ओपन जीपमधून भगिनींना अभिवादन करत कार्यक्रम स्थळी आगमन झाले. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण, दूरसंचार मंत्री डॉक्टर पेम्मास्वामी चंद्रशेखर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, केंद्रीय राज्यमंत्री कमलेश पासवान, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, खासदार स्मिता वाघ, पालकमंत्री गुलाबराव पाटील, नामदार गिरीश महाजन नामदार, अनिल पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार राजू मामा भोळे, आमदार किशोर पाटील याची उपस्थिती होती.

लखपती दीदी या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला भगिनी व मुली यांना आर्थिक बळ देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करीत असल्याचे मोदींनी सांगितले. 2014 च्या पूर्वी महिलांसाठी फक्त 25000 करोड रुपये बँक लोन सखी मंडळांना देण्यात आले. मात्र भाजपा सरकारच्या दहा वर्षाच्या काळात नऊ लाख करोड ची मदत सखी मंडळांना करण्यात आलेली आहे. सरकार मदत करत आहे.गावा गावातील महिलांचे उत्पन्न वाढत आहे त्यामुळे देश मजबूत होत आहे.

125 आर्थिक बँक सखी गावागावात जाऊन काम करीत आहेत. महिला 200 माध्यमातून आधुनिक शेती करण्यास मदत करीत आहे तर दोन लाख पशु सखींना ट्रेनिंग देत पशुपालकांना मदत करणार आहे असे पंतप्रधान यांनी यावेळी सांगितले. फॅक्टरी कृषी डेअरी देखील मोठ्या प्रमाणात मुलींना प्रशिक्षण देत आहेत. नारी शक्ती बंधन कायदा करून मोठ्या प्रमाणात महिलांना राजकारणात देखील प्रवेश दिला जात आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महिलांविरुद्ध होत असलेला अपराध अक्षम्य आहे. महिलांची गरिमा राखण्यासाठी अधिकाधिक कायदे कडक करण्यात येत आहे.

ज्या महिलेवर अत्याचार झाला असेल. ती जर पोलीस स्टेशनमध्ये येऊ शकत नसेल तर तिने ई एफ आय आर करावे. त्यासाठी भारतीय न्याय संहितेत महिलांवरील अत्याचारमध्ये फाशी व उमरकैद ठेवण्यात आली असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT