जळगाव : भुसावळ मंडळातील रेल्वे सुरक्षा दलातील सतर्क कॉन्स्टेबलने मोठ्या साहसाने एका प्रवाशाचे प्राण वाचवले आहे.
गोंडवाना एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 12406 ही शनिवार, दि. 23 रोजी बडनेरा स्थानकावरून पुढील स्टेशनसाठी मार्गस्थ झाले असताना तेव्हा एक वृद्ध प्रवासी, चालत्या रेल्वे गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी बडनेरा स्थानकावर कर्तव्यावर असलेले आरपीएफ एएसआय बी. एम. पवार आणि आरक्षक मोहम्मद तौफिक यांनी प्रसंगावधान राखून वृद्ध प्रवाशाला सुरक्षितपणे रेल्वे स्थानकावरुन अलगद खेचून प्रवाशाचे प्राण वाचवले आहे.
याबाबत मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नरखेड येथील रहिवासी मोतीराम राऊत (वय 81 वर्षे), हे शनिवार, दि. 23 रोजी गोंडवाना एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 12406 ने प्रवास करण्यासाठी रेल्वे स्थानकावर येत असताना गाडीने पुढील प्रवासासाठी प्रवास सुरू केला होता. अशातच मोतीराम राऊत यांनी सुरू झालेली गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. गाडीत चढण्यासाठी गाडीच्या हँडलला धरून प्रवासी धावत असल्याने रेल्वे स्थानकावरून खाली पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशा स्थितीत आरपीएफ कर्मचाऱ्याने प्रसंगावधान होत तत्काळ सावधगिरीने त्या प्रवाशाना सुरक्षितपणे फलाटावर ओढून अपघात टाळला.
मोतीराम राऊत (वय 81 वर्षे) व त्यांच्या कुटुंबियांनी या सतर्कतेबद्दल आरपीएफ बडनेरा टीमचे मनःपूर्वक आभार मानले आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले. आरपीएफ कर्मचाऱ्याने प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी सतर्कता, धाडस आणि समय सूचकतेचे अनोखे उदाहरण देणारे “जीवन रक्षक” म्हणता येईल. लाखो प्रवाशांचा सुरळीत आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी अनेक सतर्क आणि धाडसी रेल्वे पुरुष आणि महिला 24 x 7 काम करत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्रवाशांना आवाहन करते आहे की, चालत्या ट्रेनमधून चढणे किंवा उतरणे टाळावे ते जीवघेणे ठरू शकते.