जळगावातील ट्रक चोरीप्रकरणी दोघांना अटक Pudhari File Photo
जळगाव

जळगाव : ट्रक चोरून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जळगावमधील सुप्रीम कॉलनीतून ट्रक चोरून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या दोघा चोरट्यांना पोलिसांनी शुक्रवारी (दि.४) अटक केली. त्यांच्याकडून ८७ हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. शेबी खान चांद खान, मोहसीन उर्फ गजणी सुभान खान मुलतानी अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

रावेर तालुक्यातील विवरा येथे राहणारे शेख जावेद शेख कबीर यांनी दहा टायरी ट्रक विकत घेतला होता. १ सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील माल जळगाव येथे घेऊन नेहमीप्रमाणे सुप्रीम कॉलनीतील शालकाच्या घराजवळ ट्रक लावून घरी निघून गेले. ७ सप्टेंबरला ट्रक घेण्यासाठी ते आले असता ट्रक दिसून आला नाही. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेत फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या गुन्हे शोधपथकातील पोलीस अंमलदार यांना ट्रकचा शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व गोपनीय सुत्रांकडून माहिती मिळाली की, सदर परिसरातील शेबी खान चांद खान व मोहसीन उर्फ गजणी सुभान खान मुलतानी यांच्यावर यापुर्वीदेखील ट्रक चोरीचे गुन्हे दाखल आहेत व ते ट्रकची चोरी झाल्यापासून परिसरातून गायब आहेत. त्यांनंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दोन पथके तयार करत संशयित आरोपी शेबी खान चांद खान याला नागपुरमधील कामठी व मोहसीन उर्फ गजणी सुभान खान मुलतानी यास संभाजीनगर येथून ताब्यात घेतले. त्यांनतर या दोघा चोरट्यांनी तो ट्रक चोरी केल्याची कबुली देत त्याची विल्हेवाट लावल्याची माहिती दिली. त्यांच्याकडून ८७ हजार किंमतीचे ट्रकचे साहित्य जप्त करण्यात आले.

ही कारवाई ही पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोख नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, पोलिस उपनिरीक्षक संजयसिंग पाटील, पोहेका दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, प्रदीप चौधरी, राहुल रगडे, राहुल घेटे, किशोर पाटील, गणेश ठाकरे, नरेंद्र मोरे, नाना तायडे, किरण पाटील, नितीन ठाकरे, योगेश बारी, सिध्देश्वर डापकर, साईनाथ मुंढे, चंद्रकात पाटील यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT