स्थानबध्दतेची कारवाई  Pudhari News network
जळगाव

जळगाव : सराईत गुन्हेगार लकी जुन्नीवर स्थानबध्दतेची कारवाई

एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धता

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचे मूळ असलेल्या आणि धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेनसिंग ऊर्फ लकी जिवनसिंग जुन्नी (वय 34, रा. राजीव गांधी नगर, जळगाव) याच्यावर एमपीडीए कायद्यांर्गत नागपूर कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.

सात गंभीर गुन्ह्यांची नोंद

जेनसिंगवर जळगाव आणि इतर पोलिस ठाण्यांत एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये दरोडा, मारामारी, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी मारहाण, शस्त्र अधिनियमाचे उल्लंघन यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. इतकेच नव्हे, दोन वेगवेगळ्या जातीय तणाव वाढवणाऱ्या घटनांमध्येही त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. शिवाय त्याच्यावर सीआरपीसी 110 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करूनही जेनसिंगच्या वागण्यात बदल झाला नाही. तो खंडेराव नगर पुल परिसर आणि बुधवार बाजारात सामान्य लोकांना धमकावत होता. तसेच शहर आणि इतर जिल्ह्यांमध्ये चोरी, घरफोडी आणि दरोड्याच्या घटनांत सहभागी होत होता.

एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धता

पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी जेनसिंगच्या गुन्ह्यांची सविस्तर पार्श्वभूमी तयार करून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एमपीडीए अंतर्गत स्थनबध्दतेची ही कारवाई केली.

जेनसिंगला मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे स्थानबद्ध करण्यात आले असून या कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, संजय सपकाळे, इरफान मलिक, सुनील दामोदरे, सुशील चौधरी यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या इतर अधिकाऱ्यांनी कामगिरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT