जळगाव | जळगावनजीकच्या परधाडे रेल्वेस्थानकानजीक ‘पुष्पक एक्स्प्रेस’च्या डब्याला बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागल्याच्या अफवेमुळे डब्यातील प्रवाशांनी भीतीपोटी रुळावर उड्या मारल्या आणि त्याचवेळी समोरून सुसाट वेगाने आलेल्या ‘बंगळूर एक्स्प्रेस’खाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 12 मृतदेह व एक शीर शवाविच्छेदनासाठी आले होते मात्र शेवटी तेरा मृत्यू नसून 12 जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
शासकीय महाविद्यालयामध्ये 12 मृतदेह व एक शिर शवाविच्छेदनासाठी आणले होते मात्र शवविच्छेदन अहवालातून शीर त्या मृतदेहामध्येच एका मृतदेहाच्या निघाल्याचे स्पष्ट झाले असून या दुर्घटनेत तेरा जणांचा मृत्यू नसून 12 जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर झाले आहे.
मैसरा नंदराम विश्वकर्मा वय 40 ते 45 हल्ली मुक्काम भिवंडी राहणार नेपाळ
लच्छिराम खंनु पासी वय 40 राहणार नेपाळ
कमला नवीन भंडारी वय 42 हल्ली मुक्काम कुलाबा राहणार नेपाळ
बाबू खान वय 27 उत्तर प्रदेश
इम्तियाज अली वय 35 उत्तर प्रदेश
एक अनोळखी पुरुष वय 30 ते 35
राधेश्याम राव राहणार नेपाळ हल्ली मुक्काम मुंबई
नंदराम पदम विश्वकर्मा वय 45 हल्ली मुक्काम मुंबई राहणार नेपाळ
हीनू नंदराम विश्वकर्मा वय 10 ते 12 हल्ली मुक्काम मुंबई राहणार नेपाळ
शिवकुमार पृथ्वीराज चव्हाण वय 38 उत्तर प्रदेश
जैकला भट्टे जयगडी वय 60 ह मु भिवंड राहणार नेपाळ
नसरुद्दीन बद्रुद्दीन सिद्दिकी उत्तर प्रदेश