गिरीश महाजन यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली.  
जळगाव

Jalgaon Train Accident | नेपाळी प्रवाशांचा दफनविधी पुण्यात आणि भिवंडीत होणार

सुदैवाने मृतांचा आकडा 13 वरच राहिला : गिरीश महाजन

पुढारी वृत्तसेवा

जळगाव | जळगाव रेल्वे दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 10 मृतांची ओळख पटली आहे. 13 जण जखमी आहेत, सर्व जखमी प्रवाशांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मृतांचे नातेवाईक आले आहेत. नेपाळमधील 4 जणांचे मृतदेह याठिकाणी आहेत. त्यांचा दफनविधी पुण्यात व भिवंडी येथे करण्यात येणार आहे. 6 मृतदेह उत्तरप्रदेश मधील आहेत. दुर्घटना मोठी होती, अफवेनंतर सुमारे ४०० लोक ट्रेनमधून उतरले असल्याची माहिती मला मिळाली आहे. सुदैवाने मृत्यूचा आकडा तेरा वरच थांबला अन्यथा मोठी घटना झाली असती असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले. शासकीय महाविद्यालयात मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी ते आले असतांना त्यांनी माध्यमांना माहिती दिली.

दि. 22 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस बोगी मध्ये आग लागल्याची अफवा उठल्याने प्रवासी खाली उतरले त्याच वेळेस जळगाव कडे येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस खाली काही प्रवासी येऊन 13 जणांचा मृत्यू झाला. यापैकी दहा मृतदेहांची ओळख पटलेली आहे व त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

रेल्वे प्रशासनाकडून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना तात्काळ म्हणून 50 हजार रुपये ची मदत करण्यात येत आहे. तर मृत नातेवाईकांच्या खात्यामध्ये नंतर एक लाख रुपये टाकण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी रेल्वे प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत व तात्काळ मदत देण्यासाठी एसीएम गुड अभय शर्मा, सीनियर डीसीएम अजय कुमार सीनियर डीपीओ काझी, ए डी ओ सुनील परदेशी, कमर्शियल इन्स्पेक्टर योगेश ठोंबरे कमर्शियल रोहन बऱ्हाटे व कुलकर्णी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी नामदार गिरीश महाजन यांनी शासकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी मृतांच्या नातेवाईकांना भेट दिली असता त्यांची विचारपूस केली. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, रेल्वेच्या अपघातामध्ये 13 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि सुदैवाने हा आकडा तेरा वरच थांबला. अन्यथा ही अनर्था घडला असता. 12 ते 13 जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यामध्ये दहा मृतदेहांची ओळख पटलेली असून चार जण नेपाळ येथील आहे. मात्र मृतदेहांची अवस्था गंभीर असल्याने नेपाळला पाठवणे शक्य नाही त्यामुळे भिवंडी व पुणे येथे असलेल्या त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात त्यांना देऊन पुणे व भिवंडी येथे दफन विधी करण्यात येणार आहे.

बारा ते तेरा जखमी असून त्यामध्ये गंभीर कोणी नाही मात्र त्यांच्या सिटीस्कॅन एमआरआय सोनोग्राफी एक्स-रे काढण्यात आलेले आहेत. बहुतांशी प्रवाशांचे हात पाय फ्रॅक्चर झालेले आहेत. त्यांच्यावर औषध उपचार सुरू असून त्याचा संपूर्ण खर्च हा राज्य सरकार उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

घटना घडल्यानंतर तात्काळ प्रशासन त्या ठिकाणी जाऊन सर्वपरी मदत केली तसेच गावकऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन प्रवाशांना व जखमींना मदत केली. हे अवघ्या 50 मिनिटात प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदत केली अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT