जळगाव

जळगाव : जरांगे पाटलांच्या सभेत लुटमार करणाऱ्यांना अटक; भुसावळ तालुक्यातील पोलिसांची कारवाई

backup backup

जळगाव; पुढारी वृत्तसेवा :  मनोज जरांगे पाटील यांच्या भुसावळ तालुक्यातील सभेत लुटमार करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाचही आरोपी मालेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे या गावातील बस स्थानक चौकात चार रोजी मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. यावेळी एक लुटमारीची घटना घडली. यामध्ये मारहाण करुन ८१ हजार रुपये लंपास केल्याची फिर्याद राजू चौधरी यांनी भुसावळ तालुका पोलिसात दिली होती. फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरु करण्यात आला.

त्याप्रमाणे संशयित आरोपी अबुबकर मोहम्मद उस्मान (वय ५०, मालेगाव), नदीम अख्तर अहमद (आझाद नगर, मालेगाव), अबरार अहमद मोहम्मद रउफ (गुरुवार वाडा, मालेगाव), हमीद अली मोहम्मद, उमर रोशन आबाद (मालेगाव), बखत दाऊद हवा अब्दुल रहमान (मालेगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक वाहन देखील जप्त करण्यात आले. सर्व आरोपींना न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाची तापस डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली एपीआय रूपाली चव्हाण, पीएसआय पूजा अंधारे, दीपक जाधव, प्रेम सपकाळे, युनुस शेख, हे करत होते.

SCROLL FOR NEXT