अल्पवयीन मुलीवर अत्याचार file photo
जळगाव

जळगाव : विकृतीचे सत्र सुरुच! चोपडा तालुका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : चोपडा तालुक्यातील एका गावामध्ये अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड टाकून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला शनिवार (दि.7) रोजी रात्री अटक केली आहे.

चोपडा तालुक्यातील एका गावामध्ये शेतामध्ये राहणारा शेतकरी परिवारा मधील अकरा वर्षीय मुलगी घराबाहेर असताना त्या ठिकाणी संशयित आरोपी आला व त्याने मुलीला शेताकडे उचलून नेले. त्यानंतर त्या मुलीवर अत्याचार करून डोक्यात दगड टाकून खून केला. या घटनेची माहिती चोपडा पोलिसांना मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शनिवार (दि.7) रात्री उशिराने उप जिल्हा रुग्णालयात मुलीचा मृतदेह आणण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे तर पोलीस पुढील करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT