जळगाव | जळगाव शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे करण्यात येत आहेत. या कामांवर कधी ठेकेदार पैसे न मिळाल्यामुळे कामे बंद पडत आहेत तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचेच पोपडे निघाल्यामुळे त्यांच्या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचेच पोपडे बाहेर निघत असतील तर त्यांनी दिलेल्या किंवा त्यांनी केलेल्या कामाच्या दर्जा काय असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोठ्या प्रमाणात कामकाज करण्यात येते. यामध्ये रस्ते नाल्या व इतर कामे करण्यात येत आहे. याचबरोबर जळगाव शहरामध्ये शंभर कोटी निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मुख्य रस्ते सीमेंट काँक्रीट करण्यात येत आहे. मात्र ठेकेदारांना पैसा न मिळाल्यामुळे त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते.
रस्त्यांचे कामकाज सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ज्या उपविभागामार्फत जळगाव शहरांमध्ये ही कामे करण्यात येत आहेत त्या उपविभागाच्या भितींचे पोपडे बाहेर पडलेले दिसून येत आहे.
ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभाग कार्यालयाची अशी दयनीय अवस्था आहे त्या कार्यालयात मार्फत होणारी कामांच्या दर्जा ही व त्या कामांच्या क्वालिटीचा प्रश्नही उपस्थित होत आहे. या विभागाचे बिल्डिंग निर्मितीला 30 ते 35 वर्षाचा कालावधी झालेला आहे. जर त्या कार्यालयामध्ये असे पोपडे निघत असल्यामुळे त्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे .
यांसदर्भात उपविभागाचे अभियंता सूर्यवंशी यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल पाटील यांची भेट घेतली असता हे काम 30 वर्ष पेक्षा जास्त जुने झालेले आहेत. तरी अधिक माहिती घेऊन सांगतो असे उत्तर दिले.