Rojgar Mahaswayam - मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना CMYKPY image source - X
जळगाव

जळगाव : 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' चा लाभ घ्या - मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १३६८ युवकांना जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनांच्या माध्यमातून प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र बेरोजगार तरुणांनी अर्ज करुन या प्रशिक्षणाचा फायदा करुन घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित व उपमुख्यकार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांनी केले आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी १८ ते ३५ वर्ष वय असलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत १२ उत्तीर्ण उमेदवारांना ६ हजार,आयटी आय व पदविका उत्तीर्ण उमेदवारांना ८हजार, पदवीधर व पदवीत्तर उत्तीर्ण उमेदवारांना १० हजार रुपये इतके विद्यावेतन दरमहा देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने इतका राहणार आहे. यासाठी उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुख्यालय, पंचायत समिती, गट शिक्षण अधिकारी कार्यालय, महिला व बालविकास विभाग, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, बांधकाम उपविभाग, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत अशा विविध आस्थापनांसाठी १३६८ युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आतापर्यंत ५६१ उमेदवारांना या अंतर्गत प्रशिक्षणासाठी नियुक्ती देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सोबतच ऑफलाईन पर्याय देखील उपलब्द करुन देण्यात आला आहे. जळगाव जिल्हा परिषदेने उपलब्ध करुन दिलेली संधी विचारात घेऊन जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT