गणेशोत्सवातील महाप्रसाद खाल्यानंतर विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. (छाया: नरेंद्र पाटील)
जळगाव

जळगाव : शिवरे येथील विद्यार्थ्यांना गणेशोत्सव कार्यक्रमात महाप्रसाद खाल्यानंतर विषबाधा

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथे सारंग माध्यमिक विद्यालय शिवरे येथे शुक्रवार (दि.13) रोजी गणपती विसर्जनानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या भंडाऱ्यात शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी जेवण केले. मात्र त्यातून सुमारे 50 ते 60 विद्यार्थी विद्यार्थिनींनी जेवण केल्यानंतर त्यांना उलट्या, चक्कर, मळमळ होणे, हातपाय गळणे आदी त्रास होऊ लागल्याने त्यांना लगेच शाळेतील शिक्षक व पालकांनी प्रथम तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्रथमोपचार झाल्यानंतरही त्रास होत असल्याने पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. तर धुळे येथे दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य स्थिर झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

शिवरे दिगर येथील स्वर्गीय वसंतराव जीभाऊ बहुउद्देशीय संस्था संचलित सारंग माध्यमिक विद्यालयात शुक्रवार (दि.13) रोजी सात दिवसाच्या गणपती विसर्जना निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वरण, भात, गुलाब जामुन, मठाची भाजी असे जिन्नस होते. विद्यार्थ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर त्यांना काही तासानंतर मळमळ, चक्कर असा त्रास होऊ लागला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तत्काळ तामसवाडी येथून पारोळा येथे हलविण्यात आले. साधारण पाच वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांवर उपचार सुरू होते. अन्नातूनच विषबाधा झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले. प्रारंभी 20 ते 25 विद्यार्थ्यांनाच त्रास होऊ लागला. मात्र हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढत ही संख्या 50 ते 60 वर गेली. काही विद्यार्थ्यांवर पारोळा रुग्णालय येथे उपचार सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी यावेळी कुटीर रुग्णालयात गर्दी केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

विषबाधा झालेले विद्यार्थी असे...

नम्रता मच्छिंद्र कांडेकर, आरव्ही संभाजी पाटील, पूर्वी दीपक पाटील, धनश्री दीपक पाटील, दिव्या अमोल पाटील, कौशल्या भिकन जोगी( तरवाडे ), गायत्री जितेंद्र पाटील, मयुरी ईश्वर पाटील, प्रणाली सुभाष पाटील, तनुश्री प्रदीप पाटील, विशाल संजय निकम, कृष्णा प्रल्हाद पाटील, अंजली योगेश पाटील, पल्लवी विलास पाटील, जयेश ब्रिजलाल पाटील, राकेश किशोर पाटील, आदित्य गोरख कांडेकर, दिव्या उत्तम पाटील, दर्शना ब्रिजलाल पाटील, वेदांत बुराजी कांडेकर, कोमल समाधान पाटील, जगदीश अरुण पाटील, घनश्याम विठोबा पाटील, अक्षय विठोबा पाटील, घनश्याम निंबा पाटील, अक्षय निंबा पाटील, सागर अनिल भिल, अर्जुन महादेवराव पाटील, अश्विनी भिला शेळके, नंदिनी बारकू पाटील, माधुरी शेळके, प्रेरणा अनिल कोळी, चैताली माधवराव पाटील, वैष्णवी अशोक पाटील, भूषण डोंगर भिल, समाधान रवींद्र सरदार, साधना नारायण मिस्तरी, दुर्वेश आनंदा पाटील,जगदीश अरुण पाटील, कुणाल सुपडू बेलेकर, सोपान राजाराम भिल, कोमल समाधान पाटील.

श्रुती कैलास बेलेकर च ऐश्वर्या जगन महाले या दोन विद्यार्थिनींची अवस्था बिघडल्याने त्यांना धुळे येथे हलवण्यात आले आहे.

माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी रुग्णालयात उपस्थिती लावून विद्यार्थ्यांची विचारपूस केली.

सर्व विद्यार्थ्यांसाठी पारोळा कुटीर रुग्णालयात डॉक्टरांनी धाव घेत त्यांच्यावर त्वरीत उपचार केले. माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी देखील तत्काळ रुग्णालयात उपस्थिती लावून विद्यार्थ्यांची विचारपूस केली. आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संवाद साधून कुटीर रुग्णालयात डॉक्टरांसह स्टॉफ, वाॅर्ड मध्ये वाढ करण्याची मागणी करत रुग्णांची विचारपूस केली.

यावेळी रुग्णालयात आमदार चिमणराव पाटील, माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील, डॉक्टर हर्षल माने, डॉक्टर संभाजी पाटील, प्रांत अधिकारी मनीष कुमार गायकवाड, समीर पाटील देवगाव सरपंच, प्रभारी तहसीलदार लक्ष्मण सातपुते, शिवरे पोलीस पाटील तुकाराम पाटील, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, चंद्रकांत चौधरी पोलीस निरीक्षक सुनील पवार, उपनिरीक्षक राजू जाधव, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी देखील उपस्थित राहत विद्यार्थ्यांची विचारपूस केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT