प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या Pudhari News network
जळगाव

जळगाव : प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा

इनरव्हील क्लब जळगांव व NAB यांचा संयुक्त उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : सिंधी पंचायत हॉलमध्ये प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी रविवार (दि. 5) रोजी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या. लुईस ब्रेन यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यभरातून पुणे, मुंबई, अकोला, नागपूर, सोलापूर, अहमदाबाद इत्यादी ठिकाणाहून प्रज्ञाचक्षु बांधवांनी व भगिनींनी हजेरी लावली.

सकाळी उद्घाटन समारंभप्रसंगी NAB चे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व स्पर्धकांचे, परीक्षकांचे व आलेल्या पाहुणे मंडळींचे स्वागत सत्कार कार्यक्रमानंतर स्पर्धा घेण्यात आल्या. त्यासाठी परीक्षक म्हणून मोना टेलर व अभय कसबे यांनी काम पाहिले. कार्यक्रमासाठी प्रवीण महाजन व सुशील महाजन यांनी तबला व हार्मोनियमवर साथ केली.

स्पर्धेनंतर प्रथम तीन क्रमांक निवडण्यात आले व दोन क्रमांकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमात प्रथम क्रमांकाने समीक्षा माकोडे, द्वितीय ज्ञानेश्वर आहेरकर, तृतीय शिवचरण वडमोडे हे विजयी झाले. उत्तेजनार्थ पारितोषिक योगिता गायकवाड व पूजा शेंडे यांना देण्यात आला.

यानिमित्त इनर व्हील क्लब ऑफ जळगाव यांच्या वतीने सर्व पारितोषिक प्राप्त स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. प्रथम पारितोषिक 5000, द्वितीय 3000 रुपये, तृतीय 2000 व उत्तेजनार्थ प्रत्येकी 1000 रुपये याप्रमाणे पारितोषिके वाटप करण्यात आली. पारितोषिक कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष स्थानी ए के नारखेडे होते. सर्व पारितोषिक प्राप्त स्पर्धकांना ए. के. नारखेडे, जवाहरानी आणि इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमात इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष उषा जैन, सचिव निशिता रंगलानी, सीसी रंजन शाह , संध्या महाजन, तनुजा मोरे, रोहिणी मोरे आदी सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिंधी पंचायत हॉलचे अध्यक्ष राजेश जवाहरानी, नारायण खडके नॅबचे सचिव सी. डी. पाटील, सभासद संजय खंबायत, सुनील चौधरी, राजेंद्र खोरखेडे, विजय गिरनारे, महेश महाजन यांनी सहकार्य केले. सुनील चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT