जळगाव : भुसावळ उपविभागीय पोलीस स्टेशन अंतर्गत दर महिन्याला घेण्यात येणाऱ्या पोलीस स्टेशन टॉप कॉप ऑफ द मंथ यामध्ये चार जणांना पुरस्कार व रोख हजार रुपये देऊन गौरवण्यात आले
भुसावळ उपविभागा मधील उसळ तालुका भुसावळ शहर भुसावळ बाजारपेठ नशिराबाद पोलीस स्टेशन व शहर वाहतूक शाखा या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पोलीस स्टेशन टॉप कॉप ऑफ द मंथ हा पुरस्कार देण्यात आला. यामध्ये भुसावळ शहर पोलीस ठाणेमधून महिला पोलीस कॉन्स्टेबल ललिता रघुनाथ भारी यांनी सीसीटीव्ही मध्ये मिसिंग प्रतिबंधक कारवाई अकस्मात मृत्यू गॅंगटोडी व इतर काम शंभर टक्के पूर्ण केल्याबद्दल तर भुसावळ बाजारपेठ मध्ये जावेद हकीम शहा यांनी गंभीर गुन्हे उघडकीस आणले.
भुसावळ तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रेड पोलीस उपनिरीक्षक शामकुमार आत्माराम मगरे यांनी त्यांच्याकडील गुन्ह्याची निर्गती व गंभीर गुन्हे उघडकीस आणले. नशिराबाद पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी सुनीता मधुकर होले यांनी उल्लेखनीय कामगिरी केली तर शहर वाहतूकचे सहाय्यक फौजदार संजय भदाणे यांनी मोटर विकले नुसार मोठ्या प्रमाणात केसेस केल्या. या सर्व कर्मचाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी प्रश्नांत पिंगळे यांच्या हस्ते पोलीस स्टेशन टॉप कॉप ऑफ द मंथ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशनचे सन २०२४-२०२५ मध्ये घेण्यात आलेल्या वार्षीक तपासणी दरम्यान घेण्यात आलेल्या कायदा परिक्षेच्या पेपर मध्ये १,२ व ३ क्रमांकाने उत्तीर्ण झालेले पोलीस अंमलदार मपोकों रुपाली मधुकर कोलते ,कॉ भूषण लीलाधर चौधरी , इकबाल इब्राहिम सय्यद यांनी कायदा पेपर मध्ये १०० पैकी ८०, ७७, ८५ मार्क मिळवून प्रथम क्रमांक मिळवुन उल्लेखनीय कामगीरी केली. त्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, भुसावळ येथील शालीनी दशरथ वलके व नंदकिशोर बाबुराव सोनवणे यांची खातेनिहाय परिक्षेत उत्तीर्ण होवून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने तसेच अश्विनी गोरख जोगी यांनी सिसिटिएनएस प्रणाली कामकाजामध्ये भुसावळ उपविभागात केलेल्या उत्तम कामगीरी बाबत त्यांना देखील गौरविण्यात आले.
भुसावळ उपविभाग अंतर्गत पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी नागरिकांना सौजन्याची वागणुक देणे, पोलीस दलाची जनमानसातील प्रतिमा उंचावणेसाठी वेळीच गुन्हयातील पीडीत यांची दखल घेणे, पोलीस ठाणेस दाखल होणारे गुन्हयांचा कौशल्यापूर्वक तपास करणे, प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे, दोषसिध्दीचे प्रमाण वाढविणे, जास्तीत जास्त गुन्हे प्रकटीकरण होणेसाठी सातत्याने उत्कृष्ट कर्तव्य बजावुन "सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय" याप्रमाणे सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचा सर्वनाश करणेसाठी सांधिक भावना वाढीस लागण्यासाठी सदरची संकल्पना राबविण्यात येत आहे. यावेळी पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे, राहुल वाघ, महेश गायकवाड, आसाराम मनोरे,उमेश महाले तसेच भुसावळ उपविभागातील सर्व दुय्यम अधिकारी तसेच ६० पोलीस अंमलदार कार्यक्रमास उपस्थित होते.