Government Medical College, Jalgaon pudhari news network
जळगाव

जळगाव : मेडिकलच्या तिघांनी घेतली सहा जणांची रॅगिंग; दिल्लीतून प्रकरण समोर

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) स्त्रीरोग विभागातील पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षातील चार विद्यार्थीनी व दोन विद्यार्थ्याची रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात द्वितीय वर्षातील तीन विद्यार्थीनींनी बुधवार (दि.25) रोजी सहा जणांची रॅगिंग केल्याचे राष्ट्रीय हेल्पलाईनला ई-मेलव्दारे कळविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर जिल्हापेठ पोलिसांनी जीएमसीमध्ये येत पीडित विद्यार्थ्यांची चौकशी केली आहे. (Medical girl students complained of ragging)

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (Government Medical College, Jalgaon) स्त्रीरोग विभागातील पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षातील चार विद्यार्थींनी व दोन विद्यार्थ्याची रॅंगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जीएमसीच्या अधिष्ठाता विभागाने पीडित विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधला. गुरुवार (दि.26) रोजी सकाळी पीडित विद्यार्थीनींनी व दोन विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांची भेट घेऊन रॅगिंग विषयी माहिती दिली. यानंतर रॅगिंग करणाऱ्या तीन विद्यार्थीनींना बोलविण्यात येऊन महिला पोलिसांच्यासमोर चौकशी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी दिली आहे.

अनेक दिवसांपासून प्रकार हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचेही तक्रारदाराने नमूद केले असून, सीनिअर विद्यार्थिनींकडून होणारा छळ अधिकच वाढत असल्याने त्याला कंटाळून प्रथम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थिनींनी 'ॲंटी रॅगिंग' हेल्पलाइनवर बुधवारी तक्रार केली. तक्रारीची दखल घेत शासकीय महाविद्यालयातील 'ॲंटी रॅगिंग समितीला चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नेमका काय प्रकार झालेला आहे याची चौकशी सुरू झाली आहे .मेल प्राप्त होताच या समिती गठत करून त्याची चौकशी करण्यात येत आहे. कुठेही हलगर्जीपणा होणार नाही. तक्रारदार विद्यार्थिनींनी केलेली तक्रार मिळाल्यावरच महाविद्यालय पातळीवर विचारणा होऊन घडल्या प्रकारावर शासन निर्देशानुसार नियुक्त समितीकडे चौकशी सोपविली आहे. त्यांच्या चौकशीतून जे सत्य बाहेर येईल, त्याप्रमाणे पुढील यंत्रणेनुसार कारवाई होणार आहे.
डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव.

दिल्लीतून प्रकरण समोर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात समिती गठन करून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे मात्र विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात तक्रार का केली नाही हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. जळगाव जिल्हा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये एमडी पदवीधर शिक्षण घेत असलेल्या चार विद्यार्थिनी व दोन विद्यार्थी असे 6 जणांनी दिल्ली येथील नॅशनल रॅगिंग म्हणजे हेल्पलाइनला रॅगिंग झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर अधिष्ठाता गिरीश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली 15 जणांची समिती गठित करून 100 जणांची चौकशी करण्यात आली असून त्यांचे जबाब घेण्यात आलेआहे

येथील काम करत असलेले ब्रदर्स व सिस्टर इतर डॉक्टर साफसफाई कर्मचारी या सर्वांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. अँटी रॅगिंग समितीमध्ये समिती अध्यक्ष म्हणून उपअधिष्ठाता गिरीष ठाकूर यांच्यासह पोलीस अधिकारी, जिल्हा कार्यालयातील एक अधिकारी तहसीलदार, प्राध्यापक व इतर अशी समिती गठीत करण्यात आलेली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT