जळगाव

जळगाव : मध्यप्रदेशातील आरोपींकडून सहा मोटार सायकली जप्त

गणेश सोनवणे

जळगाव- मध्य प्रदेश मधील आरोपीकडून एमआयडीसी पोलिसांनी 6 मोटरसायकल जप्त केल्या आहेत. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

याबाबत एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मध्यप्रदेश मधील आरोपी अनोप धनसिंग कलम (कोरकु), उमर 18, निवासी- सुकवी थाना, खालवा, जिल्हा खंडवा मध्यप्रदेश, अंकीत सुकलाल ठाकुर, (कोरकु), उमर 22, निवासी- अरविंद नगर, मुसाखेडी इंन्दौर, मध्यप्रदेश यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतुन 06 वेगवेगळ्या कंपनीच्या मोटार सायकली चोरी केल्या आहे अशी बातमी मिळाली होती. त्यानुसार एक पथक तयार करुन त्यांना खंडवा कारागृहातून ताबा घेऊन त्यांना गुन्हयात अटक केली. त्यांनी पोस्टे हद्दीतुन 06 मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी याच्या कडून एकुण 06 मोटार सायकली ताब्यात घेतल्या आहेत. ज्यांची किंमत 1 लाख 85 हजार रुपये आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी , अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, सफौ. अतुल वंजारी, पोहेका गणेश शिरसाळे, गफुर तडवी, पोना सुनील सोनार, विकास सातदीवे, योगेश बारी, पोका छगन तायडे यांनी केली आहे.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT