घर नावावर करण्यासाठी वृध्दाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न  File Photo
जळगाव

जळगाव | धक्कादायक ! घर नावावर करण्यासाठी नकार; वृद्धाच्या अंगावर टाकले पेट्रोल

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : अमळनेर येथील बाहेरपूरा महोल्ला या ठिकाणी राहत असलेल्या व्यक्ती घर नावावर करून देण्यास मनाई करत असल्याने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याच्या प्रयत्न 12 रोजी करण्यात आला.अमळनेर पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ख्वाजा हसन अब्दुल गणी (72, रा. बाहेरपूरा महोल्ला, अमळनेर) हे परिवारासह शहरात वास्तव्यास आहे. सोमवारी (दि.12) रोजी सकाळी १० वाजता ते घरी असतांना गुलाम अब्दुल रहेमान तेली यांनी त्यांच्या आठ साथीदारांसह (रा. गांधीनगर, अमळनेर) घरासमोर येऊन शिवीगाळ करत राहते घर नावावर करून देण्यास बळजबरी केली. मात्र ख्वाजा हसन अब्दुल गणी यांनी राहते घर अब्दुल तेली यांच्या नावावर करून देण्यास नकार दिला.

नकार देताच गुलाम अब्दुल रहेमान तेली, रफिक अब्दुल रहेमान तेली, रहिम रमजान तेली, कांती रमजान तेली, जिशान कमाल तेली, असीम कमाल तेली, बाबु रमजान तेली, सादीक बाबु तेली, आसीफ बाबु तेली (सर्व रा. गांधी नगर, अमळनेर) यांनी 72 वर्षीय वृध्द ख्वाता गणी यांना मारहाण करून अंगावर पेट्रोल टाकून दिले. त्यानंतर आग लावून पेटवून जाळण्याचा प्रयत्न केला असता ते थोडक्यात बचावले आहे. याप्रकरणी ख्वाजा हसन अब्दुल गणी यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार मंगळवारी (दि. 13) रोजी दुपारी १२ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे या करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT