उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेतर्फे सरकारविरोधी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली Pudhari News Network
जळगाव

Jalgaon : महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या मंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून शिवसेनेचा निषेध

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेतर्फे राज्यातील भ्रष्टाचार करणारे नेते व त्यांच्या कारभाराचा निषेध करत सोमवारी (दि.11) राेजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत माजी खासदार उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून वाजतगाजत ‘प्रतिकात्मक अंतयात्रा’ काढण्यात आली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही यात्रा आणली. या वेळी सरकारविरोधी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी प्रतिकात्मक पुतळा जाळण्यास आडकाठी करण्याचा प्रयत्न केला असता मात्र शिवसैनिकांनी पारंपरिक पद्धतीने आंदोलन करून पुतळ्याला अग्निडाग दिला.

उमेश पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ‘एक रुपया पीक विमा योजना’ सध्याच्या सरकारने बंद केली. 21 दिवस पाऊस खंड पडल्यास मिळणारी अग्रिम मदत शेतकऱ्यांना आता मिळत नाही. तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेतून काही लाभार्थी वंचित आहेत.

गुलाबराव पाटील, भुसावळचे मंत्री यांच्यावरही त्यांनी टीका केली. टेक्सटाईल पार्क, गिरणा प्रकल्प, पाणीपुरवठा योजना, औद्योगिक प्रकल्प अशा अनेक विषयांवर प्रश्न उपस्थित केले. नगराध्यक्ष करण पवार यांनी पन्नास खोके प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल केला. भाजप केवळ सोशल मीडियावर धार्मिक ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकार शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मौन बाळगते, त्यामुळे आता सर्वसामान्यांनी रस्त्यावर उतरून लढा द्यावा लागेल, असे ते म्हणाले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील, दिलीपसिंह राजपूत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT