शिवचरित्र साहित्य संमेलनातील शस्त्र प्रदर्शन इतिहासप्रेमींसाठी खुले करण्यात आले आहे. छाया : नरेंद्र पाटील
जळगाव

जळगाव: शिवचरित्र साहित्य संमेलनाची धूम, शस्त्र प्रदर्शनाला गर्दी

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : येथील नुतन महाविद्यालयाच्या आवारात अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनातील प्रदर्शन आज बुधवार (दि.२६) रोजीपासून खुले करण्यात आले आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशीच प्रदर्शनाला शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट दिली असून शिक्षक वृंद व स्वयंसेवक यांची देखील गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनााला नूतन मराठा कॉलेज महाविद्यालयात बुधवार (दि.२६) ते शनिवार (दि.२९) पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भेट दिली. प्रदर्शनीचे उद्घाटन सकाळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व भाजपाच्या उपाध्यक्ष केतकी पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनामध्ये शस्त्र प्रदर्शन, चित्रप्रदर्शन, नाणी प्रदर्शन, आरमार प्रदर्शन, पगडी प्रदर्शन, मराठ्यांचे धारातीर्थ पुस्तक प्रदर्शन, सेल्फी पॉईंट, रणांगण, खेळ, वीरगळ प्रदर्शन आदी प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी भेट दिली.

शस्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी इतिहासप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.

'सेल्फी पॉइंट' ची क्रेझ

प्रदर्शनाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळच शिवछत्रपती कालीन नाण्याचे मोठे भव्य असे आरास उभारण्यात आलेले आहे. त्यानंतर शाहिस्तेखानाची बोटे कापणे, शिवाजी महाराजांना पालखीतून नेण्याचा निर्णय येथे 'सेल्फी पॉइंट' उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे या सेल्फी पॉइंटची सगळ्यांनाच भुरळ पडली होती. मुख्य गेट व प्रवेशद्वारा जवळ शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे. त्यानंतर नाणे प्रदर्शन, पगडी प्रदर्शन, आरमार प्रदर्शन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रसिकांची गर्दी दिसत होती. या गर्दीमध्येच सर्वाधिक स्वयंसेवक व नूतन मराठा कॉलेजचे शिक्षक वर्ग दिसून आले.

गुरुवार (दि.२७) रोजी सकाळी नऊ ते बारा वाजता अखिल भारतीय श्री चरित्र साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार राजू मामा भोळे, ना. गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, संमेलनाचे उद्घाटक शिवाजीराजे भोसले तजावर, संमेलन अध्यक्ष विजय देशमुख नागपूर यांच्या उपस्थित उद्घाटन पार पडणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT