जळगाव जिल्ह्यातील क्लस्टर विकास कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना केंद्रीय राज्यमंत्री युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय रक्षा खडसे. समवेत आमदार राजू मामा भोळे व जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे. Pudhari News network
जळगाव

Jalgaon | शंभर कोटीच्या बनाना क्लस्टरसाठी जिल्ह्याची निवड

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या क्लस्टर विकास कार्यक्रम खासदार रक्षा खडसेंची माहिती

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्हा हा संपूर्ण देशात तसेच विदेशामध्ये केळी उत्पादनासाठी ओळखला जातो. भारत सरकारने फलोत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने क्लस्टर विकास कार्यक्रम घेतला आहे. त्यामध्ये जळगाव जिल्ह्याची निवड झाली असून यासाठी मेघा क्लस्टर म्हणजे जवळपास 100 कोटीचा प्रकल्प जळगाव जिल्ह्यात येणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे व त्यांना मार्केटही मिळणार आहे.

भारताच्या फलोत्पादन क्षेत्राला त्यांना देण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ क्लस्टर विकास कार्यक्रमांतर्गत 53 फलोत्पादन क्लस्टर विकसित करण्याची योजना आहे. उत्पादन क्षमता वाढवणे एक्सपोर्ट उत्पादनामध्ये सुधारणे आणि ऑर्गानिक्स फार्मिंग साठी पायाभूत सुविधा निर्माण करणे हे उपक्रमाचे मुख्य उद्देश आहे यासाठी 53 पैकी जळगाव जिल्हा हा बनाना पायलट प्रकल्पासाठी निवडले गेलेले असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय रक्षा खडसे केंद्रीय यांनी दिली. यावेळी जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे व जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा व मुक्ताईनगर यामध्ये मोठ्या प्रमाणात केळी उत्पादन केले जाते. या उद्देशअंतर्गत मोठ्या प्रमाणात केळी पुरवली जाते. यासाठीच बनाना क्लस्टर प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेली आहे. या माध्यमातून रॅपिंग व कोल्ड चेंबर हाय डेव्हलपिंग लॅब वेगवेगळ्या व्हायरस वर संशोधन व टिशू कल्चरवर काम करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना ऑर्गानिक फार्मिंग वाढवण्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा चालवण्यात येतील. तसेच रेल्वेतून जेएनपीटी थेट वाहतूक करण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बराचसा खर्च वाचणार आहे. जिल्ह्यात दररोज दहा टन केळी उत्पादन होत असून वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाहेरच्या देशात मालाची मागणी कमी होत आहे. जळगाव जिल्ह्यात डोमेस्टिक मार्केट म्हणजेच स्थानिक मार्केट मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे एक्सपोर्ट मार्केट वर भर दिला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी उत्पादनला चांगला भाव मिळेल.

सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात शेजारील देशांमध्ये इराण, इराक, अफगाणिस्तान, दुबई, बहरीन, अझरबजैन आणि कुवेत या ठिकाणी मागणी वाढत आहे. याचबरोबर रशियामध्ये अपेडाच्या (APEDA - Agricultural and Processed Food Products Export Development Authority) माध्यमातून चर्चा सुरु आहे. येत्या काळात रशिया सुद्धा केळीसाठी मोठे मार्केट उपलब्ध राहणार आहे. यासाठीच पुढील महिन्यात रशियामध्ये अपेडाचे अधिकारी व काही शेतकरी यांना पाठवून त्या ठिकाणी मार्केट पाहणी करणार असल्याची माहिती नामदार रक्षा खडसे यांनी दिली.

क्लस्टर मध्ये प्रोसेसिंग युनिट सुद्धा येणार आहेत, ज्यामध्ये बनाना पावडर बनवण्यात येणार आहे. तसेच सध्याला फ्रोजन फुड मार्केट मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. येत्या काळात ऑर्गानिक फार्मिंगवर भर देण्यात येणार आहे.

टिशू कल्चर स्वरुपाचा भाव सध्याला 18 ते 20 रुपये झालेला आहे. जमिनीचे माती परीक्षण हायटेक लॅब नाही यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात. खते कसे वापरावे याची सुद्धा माहिती नसल्याने या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांना ऑरगॅनिक फार्मिंग वळवण्यासाठी सरकार मदत करणार आहे. ऑर्गानिक उत्पादनाला भाव चांगला मिळतो. यासाठी रिव्हर्स प्रोसेसिंग सुरू असून ज्यामध्ये सरकार सबसिडी देण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन वर्षात हा बनाना प्रोजेक्ट पूर्ण होईल असेही रक्षा खडसे यांनी यावेळी सांगितले

रावेर, यावल येथून पाण्याचा विसर्ग होत असला तरी धरणांवर लक्ष केंद्रीत करुन छोटे छोटे कॅनल तयार करून त्याद्वारे शेतकऱ्यांच्या विहिरीची व जमिनीतील पाणी पातळी कशी वाढेल यावर भर देण्यात येणार असल्याचे रक्षा खडसे यांनी सांगितले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT