जळगाव

जळगाव : वाळूची बैठक बिस्किट-चहावर आटोपली

तुमचे गाव तुम्हीच राखा -- जिल्हाधिकारी

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील चांदसर या ठिकाणी तलाठी यांना मारहाण झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आलेली आहे. वर्ष संपायला एक दिवस बाकी असताना जिल्हाधिकाऱ्यांनी गिरणा वाढू असलेल्या भागातील सरपंचाची बैठक लावली. या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही मात्र तुमचे गाव तुम्हीच राखा असे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे बैठकीला आलेल्या सरपंचांना चहापाण्यावर परत पाठवण्यात आले. अवैध वाळू उपसा कसा थांबेल यावर कोणताही विचार विनिमय झाला नसल्याचे उपस्थित सरपंचांनी व नागरिकांनी सांगितले.

महसूल विभागाच्या तलाठ्यावर वाळूमाफीया यांनी हल्ला करून त्याला जखमी केले होते. याचे परिणाम असे झाले की, पोलीस प्रशासनाने खडबडून जाग झाली व त्यांनी तात्काळ कारवाई सुरू केली. वाहतूक शाखा एलसीबी तो इतर स्थानिक पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यास प्रारंभ केला. सोमवार (दि.30) रोजी जिल्हा नियोजन समितीमध्ये धरणगाव, अमळनेर, भडगाव, पाचोरा, जळगाव ग्रामीण व इतर ठिकाणी सरपंच, तलाठी, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना बैठकीस प्राचार्य यांना आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याने आपापल्या समस्या मांडल्या व वाढीव वाहतूक थांबवण्यासाठी त्यांनी मागणी केली मात्र यावेळी तुमचे गाव तुम्हीच राखा असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना कोणतेही संरक्षण देण्यात येईल की नाही, त्यांनी कारवाई करून कोणाला सांगायचे याबद्दल कोणत्या सूचना देखील देण्यात आल्या नाहीत.

गणेश पाटील यांनी नावाने गुन्हे दाखल झाले आहे मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली त्या गुन्हेगारांना सोडून देण्यात आले होते . आम्ही अवैध वाळू थांबवू मात्र आम्हाला कोणत्याही प्रकारचे संरक्षण किंवा पोलीस प्रशिक्षण मिळेल याबाबत या बैठकीत सांगण्यात आले नाही. मग हे अवैध वाळू उपसा वाहतूक कशी थांबवावी असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे कारण अवैध वाळू वाहतूक करणारे आमच्या अंगावर धावून येतात त्यांच्याजवळ शस्त्र असतात आमच्याकडे कोणते शस्त्र काहीच नसते. मग ही वाळू वाहतूक कशी थांबवावी.
पंढरी उत्तम पाटील, कुरंगी ता चोपडा, जळगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT