प्रातिनिधीक छायाचित्र pudhari photo
जळगाव

Jalgaon Sand Mafia | वाळू माफियांचे धाबे दणाणले! जळगाव जिल्हा पोलिसांची धडक कारवाई; ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त, २१ आरोपींना पकडले!

७ डंपर आणि ७ ट्रॅक्टरसह साडेएकोणीस ब्रास वाळू जप्त!

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि तस्करी करणाऱ्या वाळू माफियांवर जळगाव जिल्हा पोलिसांनी एकाच दिवशी कारवाई केली. सोमवार 27 जुलै रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी केलेल्या कारवाईतमध्ये तब्बल ८८ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २१ आरोपींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव उपविभाग, फैजपूर, मुक्ताईनगर, चाळीसगाव आणि अमळनेर उपविभागांतर्गत ही धडक मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ७ डंपर, ७ ट्रॅक्टर आणि सुमारे १९.५० ब्रास अवैध रेती असा एकूण ८८ लाख ६ हजार ५०० रुपयांचा साठा हस्तगत केला आहे. या प्रकरणी एकूण ०७ गुन्हे दाखल करण्यात आले असून ०२ गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

MIDC पोलीस ठाणे (जळगाव): SDPO गणापुरे यांच्या पथकाने दोन स्वतंत्र कारवाया केल्या. ६२९/२०२६ अन्वये ४ ब्रास वाळूसह डंपर (किंमत १०.०८ लाख) आणि ६२८/२०२६ अन्वये डंपर (किंमत ५ लाख) जप्त केला. या प्रकरणी २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

यावल पोलीस ठाणे: पोनि यावल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर व १ ब्रास वाळू (किंमत ४.०६ लाख) जप्त करत एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मुक्ताईनगर पोलीस ठाणे: SDPO व पोनि मुक्ताईनगर यांच्या पथकाने २ ब्रास वाळूसह अशोक लेलँड डंपर (किंमत १५.१० लाख) जप्त केला.

सावदा पोलीस ठाणे: सपोनि सावदा यांच्या पथकाने MH 21 G 0681 डंपर आणि २.५० ब्रास वाळू (किंमत १०.15 लाख) जप्त केली. यात २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

बोदवड पोलीस ठाणे: बोदवड तहसीलदार यांच्या सहकार्याने झालेल्या कारवाईत डंपर (किंमत २ लाख) जप्त करण्यात आला असून ७ आरोपींवर कलम १३२, ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.

भडगाव पोलीस ठाणे (चाळीसगाव उपविभाग): पोलीस निरीक्षक भडगाव व स्टाफने दोन कारवायांत २ डंपर आणि २.५० ब्रास वाळू (किंमत २०.३० लाख) जप्त करून २ आरोपींवर गुन्हे नोंदवले.

अमळनेर पोलीस ठाणे: अमळनेर पोलीस स्टेशन, SDPO कार्यालयीन स्टाफ व पोनि अमळनेर यांनी संयुक्त कारवाई करत तब्बल ०६ ट्रॅक्टर आणि ७.५० ब्रास वाळू (किंमत २१.३७ लाख) जप्त केली. यात ६ आरोपींवर कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यातील भुसावळ, पाचोरा आणि चोपडा उपविभागात मात्र एकही कारवाई झाली नसून ('निरंक') अहवाल आहे. भुसावळ विभागातील नशिराबाद येथून थेट राष्ट्रीय महामार्गाने किंवा नशिराबाद कुऱ्हा मार्गाने रात्री मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असते. पाचोरा चोपडा येथून गुजरात कडून येणारी किंवा नंदुरबार कडून येणारी रेती वाहतूक सुरू असते या वाहतुकीला पोलीस प्रशासन कसा आळा घालणार हे पाहणे महत्त्वाचे राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT