जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; दिवाळी संपत आल्याने माहेरवासीणी पुन्हा सासरकडे परतीचा प्रवास करीत आहे. यामुळे खाजगी बसेस महामंडळ पूर्ण क्षमतेने वाहतूक करीत आहे. खाजगी बसेसची सदोष बांधणी करणे व अतिरिक्त प्रवाश्यांची वाहतूक करून रस्ता अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या चार बसेस वर प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव येथील वायु पथकाने आज जप्तीची कारवाई केलेली आहे. चारही बसेस आरटीओ कार्यालय जळगाव येथे लावण्यात आलेल्या आहे.
दिवाळी संपली असल्याने मुंबई -पुणे कडे जाणारे प्रवासी हे बहुतांशी रेल्वेने रिझर्वेशन न मिळाल्याने खाजगी बसेसने मोठ्या प्रमाणात प्रवास करीत आहे. यात प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार न करता आर्थिक फायदा होण्यासाठी खाजगी बस धारकांनी नियमांचे उल्लंघन करून खाजगी बसेसची बांधणी केलेली आहे. याबसेसवर आरटीओने कारवाई केली आहे. खाजगी बसची लांबी 12.50 मीटर इतकी हवी मात्र ती यापेक्षाही जास्त होती. तसेच बसमध्ये नियमानुसार 30 बर्थ असाव्या लागतात, येथे 38 बर्थ आढळल्या. संकटाच्यावेळी बसमधून बाहेर पडण्यासाठी मार्ग असावा लागतो मात्र, तेथेही बर्थ बसविण्यात आल्या होत्या. त्यामुळे या बसेसवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक नितीन सावंत, गणेश लवाटे, नूतन झांबरे यांनी केली.
हेही वाचा :