जळगाव : जळगाव जिल्ह्यावर वादळी वाऱ्यांसह पावसाने बुधवारी (दि.11) रोजीच्या रात्री जोरदार हजेरी लावली. या नैसर्गिक संकटात महावितरणला कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागले असून, जिल्ह्यात अनेक भागांचा वीजपुरवठा पूर्णतः खंडित झाला. झाडे वीज तारांवर पडल्यामुळे तसेच रोहित्र आणि खांबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयाचा वीजपुरवठा गुरुवार (दि.12) रोजी दुपारी एक वाजेपर्यंत खंडित होता. इतर शासकीय कार्यालयांमध्ये याच वेळी अंधाराचे साम्राज्य होते. वीज नसल्यामुळे कार्यालयातील कर्मचारी बाहेर रस्त्यांवर घामाघूम अवस्थेत दिसत होते. वादळामुळे अनेक झाडे रस्त्यांवर आणि वीज तारांवर कोसळल्याने, काही ठिकाणी रोहित्र बंद पडले तर काही ठिकाणी वीज खांब कोलमडून पडले. परिणामी जिल्ह्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा १२ तारखेच्या दुपारपर्यंतही सुरळीत झालेला नव्हता. मात्र महावितरणकडून युद्धपातळीवर कामे करून काही भागांतील वीज पुरवठा पुनर्संचयित करण्यात आला.
गिरणा पंपिंग
महाबळ
हुडको
चिंचोली
वाघूर
या उपकेंद्रांवर दुपारपर्यंत काम सुरू होते..
शिवाजीनगर
निमखेडी
रिंगरोड
विदगाव
जळके
म्हसावद
कासोदा
उत्राण
नागदुली
रिंगणगाव
महावितरणकडून अद्यापही युद्धपातळीवर वीज पुनर्संचयित करण्याचे काम सुरू असून, नागरिकांना शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. वादळी वाऱ्याने जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वेगवेगळ्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.