जळगाव | जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये संध्याकाळी सहा वाजेनंतर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. प्रशासनाने मतदारांना मतदानासाठी क्रमांक देऊन गेट बंद करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अकराही विधानसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी सहा वाजेनंतर मतदानाच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये चोपडा- भडगाव सर्वाधिक रांगा लागलेल्या होत्या. त्यानंतर मुक्ताईनगर रावेर जळगाव सिटी भुसावळ आणि चोपडा या मतदारसंघांमध्ये मतदारांच्या मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या होत्या.
खबरदारी म्हणून मतदार मतदानासाठी वंचित राहू नये म्हणून मतदारांना क्रमांक दिले होते. त्यानंतर संबंधित मतदान केंद्राचे संपूर्ण गेट बंद करण्यात आले.
यावेळी पोलीस प्रशासनाने काही अप्रिय घटना होऊ नये म्हणून ज्या ठिकाणी मतदानाच्या रांगा लागलेल्या आहेत. त्या ठिकाणी कडोकोट बंदोबस्त लावला.
तर संपूर्ण मतदान यंत्रणेवर नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेडी, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुरलीकर, जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी श्री. अंकित यांनी ठाण मांडून होते.