Bribe Case AI Photo
जळगाव

Jalgaon Pwd Bribe Case: 15 लाखांच्या बिलासाठी 5 लाखांची लाच; अभियंत्याला कार्यालयातूनच अटक

सार्वजनिक बांधकाम विभागातील मक्तेदाराचे थकलेले बिल मंजूर करण्यासाठी तब्बल १५ लाखांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon PWD Engineer Arrested

जळगाव : जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील मक्तेदाराचे थकलेले बिल मंजूर करण्यासाठी तब्बल १५ लाखांची मागणी करणाऱ्या ज्युनियर इंजिनिअरला ५ लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. योगेश अहिरे असे या लाचखोर अभियंत्याचे नाव असून, शनिवारी भरदिवसा झालेल्या या कारवाईने विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

जळगाव जिल्ह्यातील एका मक्तेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कामे केली होती. या कामांची बिले मंजूर करण्याचे ज्युनिअर इंजिनिअर योगेश अहिरे याच्याकडे होती. त्याने बिलाच्या मोबदल्यात १५ लाख रुपयांची मागणी केली होती.

हक्काचे पैसे देण्यासाठी लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित तक्रारदाराने जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. एसीबीने तातडीने तक्रारीची पडताळणी केली असता, अहिरेने १५ लाख मागितल्याचे स्पष्ट झाले. तडजोडीअंती ५ लाख रुपये देण्याचे ठरले. शनिवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या परिसरातच एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे जशी ५ लाखांची रक्कम अहिरेने स्वीकारली, तसा दबा धरून बसलेल्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.

ही यशस्वी कारवाई उपविभागीय अधिकारी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT