जळगाव शहरात महीलांच्या सुरक्षेबाबत होर्डिंग्ज झळकवत जनजागृती केली (छाया : नरेंद्र पाटील)
जळगाव

जळगाव : गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘महिला सुरक्षेवर’ भर देत जनजागृती

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात अनंत चतुर्दशी दिवशी मंगळवारी (दि.17) रोजी गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला ढोल ताशांच्या गजरामध्ये व डीजेच्या आवाजात भावपूर्ण निरोप दिला. यावेळी भुसावळ पारोळा या ठिकाणी महीलांची सुरक्षितता आणि देशाच्या सुरक्षेवर’ होर्डिंग्ज झळकवत जनजागृती केली. तसेच विविधरंगी फुलांच्या वर्षावामध्ये गणेशाचे विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः ढोल वाजवत विसर्जन मिरवणुकीचा मनमुरादपणे आनंद घेतला. यावेळी तृतीय पंथीयांनी सुद्धा गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला.

जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यात शांततेत व वेळेत गणेश विसर्जन शांततेत पार पडले. विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या अधिकारीवर्ग आणि नेत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. जळगाव शहरात मंगळवारी (दि.17) सकाळी मानाच्या गणपतीची आरती झाल्यानंतर मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: ढोल वाजवून श्रीगणेशाच्या मिरवणुकीत सहभाग नोंदवत आपला आनंद व्यक्त केला.

जळगाव शहरात ढोलपथकाने ठेका धरत गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला.

पारोळा शहरात अनेक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक सोमवारी (दि.16) रोजी जल्लोषात काढण्यात आली. या विसर्जन मिरवणुकीत मोरफळ गल्लीतील राधाकृष्ण गणेश मित्र मंडळ, खांडेकर वाड्यातील सर्वेश्वर गणेश मित्र मंडळाच्या महिलांनी डी जे चा तालावर ठेका धरत ‘महीला व देश सुरक्षेवर’ होर्डिंग्ज झळकवत जनजागृती केली. बलात्कार करणाऱ्या व्यक्तिला फाशी हीच योग्य शिक्षा असल्याचे यामधून सांगण्यात आल्याने या होर्डिंग्ज ने सर्वांचेच लक्ष वेधले. त्यानंतर गुलालाची उधळण व फुलांच्या पाकळ्यांची उधळण करीत ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जल्लोषाने परिसर दुमदुमून सर्वत्र चैतन्याचे वातावरण दिसून आले.

भुसावळ शहरातील गडकरी नगर, गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचगाण्याबरोबरच महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत जनजागृती केली. "या देशात आता छत्रपतींचा कायदा पाहिजे अशा नराधमांना भर चौकात फाशी दिली पाहिजे". तुम्हाला जर वाटत असेल की राजे पुन्हा जन्माला यावे तर आधी प्रत्येक जिजाऊचा सन्मान केला पाहिजे असे वाक्य मिरवणुकीमध्ये फलकाच्या रूपात झळकत होते.

जामनेर रोड भागामध्ये किन्नर समाजाने बसवलेला श्रीगणेशाच्या मूर्तीचे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.

भुसावळ या ठिकाणी नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि.17) रोजी सायंकाळी मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी जामनेर रोड भागामध्ये किन्नर समाजाने बसवलेला श्रीगणेशाच्या मूर्तीचे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. तृतीय पंथीयांनी डीजेच्या तालावर ठेका धरत विसर्जन मिरवणूकीत सहभागत नोंदवत श्रीगणेशाला भावपूर्ण निरोप दिला.

जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ, रावेर या ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीतील संवेदनशीलता दिसून आली. यामध्ये लहान मुले लाडका बाप्पा गावाला जातो आहे, हे पाहून भावूक झाली होती. या ठिकाणी मुख्य मिरवणुकीचा रस्ता अरुंद असूनही या ठिकाणाहून मोठमोठ्या मुर्त्यांना मोठे अडचणीचे असते. या मार्गावरील मिरवणूक सुरू झाल्यानंतर त्या परिसरातील संपूर्ण लाईट बंद करण्यात येते व जनरेटरच्या व्यवस्थेने लाईटींगची व्यवस्था केली जाते. कोणताही अनुचित प्रकार घडून नये व संभाव्य अपघात होऊ नये म्हणून या मार्गावर पूर्वतयारीने व्यवस्था करण्यात येते. त्यामुळे येथे शांततेत गणेश विसर्जन पार पडले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT