जळगाव

Jalgaon Crime : जळगाव हादरले! पोलिसांनी राबवले ‘ऑपरेशन ऑल आऊट’; ६ लाखांचा अवैध माल जप्त

पुढारी वृत्तसेवा

जळगाव: जिल्ह्यात काल, सोमवारी (दि. १) रात्री जळगाव पोलिसांनी अचानक ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवत मोठी कारवाई केली. रात्रीच्या अंधारात गुन्हेगारांचा शोध घेत पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकले. यामध्ये दारू विक्री, जुगार आणि सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करत पोलिसांनी एकाच रात्रीत तब्बल ६ लाख ५२ हजार ८७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

६.५ लाखांचे रसायन नष्ट!

अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, पोलिसांनी मुंबई प्रोहिबिशन अ‍ॅक्ट (दारूबंदी कायदा) अंतर्गत १२ गुन्हे दाखल केले आहेत. गावठी दारूच्या अड्ड्यांवर धाड टाकून पोलिसांनी ३१३ लीटर हातभट्टीची दारू, ४,५०० लीटर कच्चे रसायन आणि १,६०० लीटर केमिकल जागेवरच नष्ट केले. यासोबतच १०५ देशी दारूच्या बाटल्या, २८ विदेशी दारूच्या बाटल्या आणि १५ बिअरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

टवाळखोर आणि तळीरामांवर कारवाई

रात्रीच्या वेळी चौकाचौकात आणि गल्लीबोळात थांबून महिलांची छेड काढणाऱ्या तसेच दहशत निर्माण करणाऱ्या १९ टवाळखोरांना पोलिसांनी ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. तसेच, ‘रात्रीचे राजे’ बनून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्या ७ तळीरामांनाही पोलिसांनी कोठडीची हवा दाखवली.

जुगाराच्या अड्ड्यांवर धाड

शहरात आणि परिसरात छुप्या पद्धतीने चालणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यांवरही पोलिसांनी छापे टाकले. यात २ जुगार केसेस दाखल करण्यात आल्या असून, जुगाराचे साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT