भुसावळ: भुसावळ उपविभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या पोलीस स्टेशनच्या पोलीस अंमलदारांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यासाठी आणि त्यांच्यात सांघिक भावना वाढविण्यासाठी "पोलीस स्टेशन टॉप कॉप ऑफ द मंथ" या पुरस्काराची संकल्पना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत माहे फेब्रुवारी-2025 मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अंमलदारांना गौरविण्यात आले.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ उपविभागातील पोलीस ठाण्यात हा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत, भुसावळ उपविभागातील विविध पोलीस ठाण्यातील अंमलदारांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल समानित करण्यात आले.
भुसावळ शहर पोलीस ठाणे: कॉन्स्टेबल मेहल मनोजकुमार शहा
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे: पो. ना. विनोद नारायण डोळे
भुसावळ तालुका पोलीस ठाणे: संजय वासुदेव कणखरे
नशिराबाद पोलीस ठाणे: पो. कों. सागर श्रावण भिडे
शहर वाहतूक शाखा, भुसावळ: सलीम नबी शेख तसेच, भुसावळ तालुका आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या वार्षिक तपासणी दरम्यान घेण्यात आलेल्या कायदा परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अंमलदारांचा देखील गौरव करण्यात आला.
वार्षिक कायदा परीक्षेत उत्तीर्ण झालेले अधिकारी यामध्ये भुसावळ तालुक्यातील पो. हे. को. संजय आत्माराम तायडे - ८९ गुण (प्रथम क्रमांक), पो. कॉ. लिना मधुकर लोखंडे - ८३ गुण (व्दितीय क्रमांक), पो. हे. को. कैलास अशोक बाविस्कर - ७७ गुण (तृतीय क्रमांक)
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे येथील पो. कॉ. हर्षल सुरेश महाजन - ८८ गुण (प्रथम क्रमांक), पो. कॉ. सागर विश्वनाथ वंजारी - ७९ गुण (व्दितीय क्रमांक), पो. हे. को. अतुल शंकरराव पवार - ७८ गुण (तृतीय क्रमांक) या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस दलातील अधिकाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कर्तव्यासाठी प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे पोलीस दलातील सांघिक भावना वाढण्यास मदत होत असून, गुन्हे प्रकटीकरणास चालना मिळत आहे. कार्यक्रमाप्रसंगी पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, पो. निरी. राहुल वाघ, पो. निरी. महेश गायकवाड, स. पो. निरी. आसाराम मनोरे, स. पो. निरी. राहुल भंडारे आणि भुसावळ उपविभागातील सर्व दुय्यम अधिकारी तसेच 60 पोलीस अंमलदार उपस्थित होते.