अंकुश पिनाटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करताना सकल हिंदू समाज संघटनाचे पदाधिकारी.  (छाया : नरेंद्र पाटील)
जळगाव

जळगाव : सकल हिंदू समाजाचा आक्रोश - एक दिवस कडकडीत बंद

सकल हिंदू समाजाचा आक्रोश - एक दिवस कडकडीत बंद

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : बांगलादेश येथे अल्पसंख्यांक हिंदू यांच्यावर होत असलेल्या अत्याचारा विरोधात संपूर्ण देशभरात सकल हिंदू समाजात आक्रोशाची लाट पसरलेली आहे. बांगलादेशमध्ये हिंदूत्वावर अन्याय होत असून मठ मंदिर हिंदूंची प्रार्थना स्थळे उध्वस्त केली जात आहे. या सर्व घटनेचा निषेध म्हणून शुक्रवार (दि.16) जळगाव जिल्ह्यातील सकल हिंदू समाज एकमताने रस्त्यावर उतरलेला आहे.

सकल हिंदू समाजातील सर्व व्यापारी मंडळ, फुले मार्केट, गोलानी मार्केट, बि. जे. मार्केट, दाना बाजार, गांधी मार्केट, शहरातील सर्व छोटे मोठे व्यापारी संकुल, एमआयडीसी परिसरातील लघुउद्योग भारती, जिंदा, भाजप उद्योग आघाडी तसेच जिल्ह्यातील विविध व्यापारी व विक्रेते संघटना तसेच शाळा महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, फुटपाथ विक्रेते सर्वांनी एकमताने या घटनेचा निषेध म्हणून एक दिवस कडकडीत दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन एकत्रित आलेले आहेत.

सकल हिंदू संघटनेने बंदची सुरुवात भवानी मातेची आरती करून पुढे नेली. शुक्रवार (दि.16) सकाळी 9.30 वाजता सुभाष चौक येथील भवानी माता मंदिर परिसरात मोठ्या संख्येने हिंदू समाजातील विविध संघटनेतील लोक एकत्रित जमून भवानी मातेची आरती करण्यात आली त्यानंतर सकाळी 10.30 वा. शांततेत तीन तीनच्या लाईन करुन मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला वर्ग सहभागी झाले. मोर्च्याची सुरुवात सुभाष चौक - दाना बाजार-टॉवर चौक, शिवतीर्थ हेडगेवार चौक, स्वातंत्र्य चौक तेथून कलेक्टर ऑफिस या मार्गाने हजारोच्या संख्येने मोर्चा कलेक्टर ऑफिसला धडकला. त्यानंतर जमलेल्या सर्व हिंदू बांधवांना महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी जी महाराज यांनी संबोधित केले.

भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंना वाचवण्यासाठी योग्य ती पावले उचलावी. बांगला देशातील भयावह परिस्थितीमुळे सीमेवर जमलेल्या हिंदू बांधवांसाठी भारत सरकारने छावण्या सुरू कराव्यात. गेल्या काही दिवसापासून देशात सुद्धा काही जिहादी मानसिकतेमुळे देशात असे कृत्य घडत असल्याने अशा विकृतींवर कठोर कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अशा मागण्या निवदेनाद्वारे मांडण्यात आल्या आहेत. निवेदनाची प्रत राष्ट्रपतींना देखील पाठवण्यात आली आहे. सकल हिंदू समाज संघटनेने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असता यावेळी अतिरीक्त जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी निवेदन स्विकारले. याप्रसंगी महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी महाराज फैजपूर, ह.भ.प गजानन महाराज वरसाडेकर, ह.भ.प समाधान महाराज भोजेकर, ह.भ.प दीपक महाराज, विहिंप चे प्रांत सहमंत्री ललित चौधरी, जिल्हाध्यक्ष हरीश मुंदडा, रा.स्व.सं विभाग कार्यवाह अविनाश नेते , शहर संघ चालक उज्वल चौधरी , राकेश लोहार, अनिल अडकमोल , अमित भाटिया, डी. एन. तिवारी आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT