जळगाव : भुसावळ शहरातील नवोदय विद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या श्री. झोपे यांच्या विहिरीत एका ४५ ते ५० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आज, ४ एप्रिल रोजी मिळून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काय आहे सविस्तर घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, नवोदय विद्यालयाच्या परिसरातील झोपे यांच्या विहिरीत एक मृतदेह तरंगताना आढळून आला. स्थानिकांनी ही माहिती तात्काळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीबाहेर काढला. मयत इसमाचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे असून त्याच्या डोक्यावर टक्कल आहे.
पोलिसांना मिळालेल्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, मयत इसमाच्या अंगावर उजवे मनगटवर 'ॐ' (ओम) हे अक्षर गोंदलेले आहे. हातात लोखंडी कडे आणि काळा धागा बांधलेला आहे.डोक्यावर टक्कल पडलेले आहे. सदर वर्णनाचा किंवा खुणांचा कोणताही इसम बेपत्ता असल्यास अथवा कोणाला या व्यक्तीबद्दल माहिती असल्यास त्यांनी तात्काळ भुसावळ तालुका पोलीस स्टेशन यांनी ९९२३४४२६२२ ८३०८६६८३६६ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.