जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित खानदेश सेंट्रल येथे सुरु असलेली राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा. (छाया : नरेंद्र पाटील)
जळगाव

Jalgaon News | राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत श्लोक शरणार्थी आघाडीवर

Championship Chess Tournament: स्पर्धा पार पडल्यानंतर आजच होणार बक्षीस वितरण

पुढारी वृत्तसेवा

जळगाव: महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित खानदेश सेंट्रल येथे आयोजित H2e पॉवर सिस्टीम पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स यांचे प्रायोजकत्व लाभलेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या वयोगटाच्या राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात दुसऱ्या दिवशी आघाडीवर असलेल्या पुण्याचा प्रथमेश शेरला व नंदुरबारचा जितेंद्र पाटील यांच्यात इंग्लिश ओपनिंग ने झालेल्या डावाच्या अंतिम पर्वात ४२ चालीत प्रथमेश याने सहज विजय प्राप्त केला. तर दुसऱ्या पटावर मात्र ठाण्याचा अथर्वसोनी व पुण्याचा श्लोक शरणार्थी यांचा पर्क डिफेन्स झाले ला डाव ३५ व्या चाली अखेर बरोबरीत सुटला.

राज्यभरातून आलेले बुध्दीबळपटू आपले नशीब आजमावत आहेत.

राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात दुसऱ्या दिवशी आघाडीवर असलेल्या पुण्याचा प्रथमेश शेरला व नंदुरबारचा जितेंद्र पाटील यांच्यात इंग्लिश ओपनिंग ने झालेल्या डावाच्या अंतिम पर्वात ४२ चालीत प्रथमेश याने सहज विजय प्राप्त केला. तर दुसऱ्या पटावर मात्र ठाण्याचा अथर्वसोनी व पुण्याचा श्लोक शरणार्थी यांचा पर्क डिफेन्स झाले ला डाव ३५ व्या चाली अखेर बरोबरीत सुटला . पटावर जळगावच्या अजय परदेशी याने आपल्यापेक्षा अधिक मानांकन असलेल्या मुंबईच्या राम विशाल परब यास बरोबरीत रोखले. चौथ्या पटावर मात्र पुण्याच्या ओम लमकाने याने आघाडीवर असलेल्या कोल्हापूरच्या आदित्य सावळकर यास रॉयल लो लोपेझ पद्धतीने झालेल्या डावात बरोबरीत रोखले

स्पर्धेच्या आजच्या सहाव्या फेरीत पुण्याच्या श्लोक शरणार्थी याने फ्रेंच किंग्स इंडियन डिफेन्स ने झालेल्या डावात पुण्याच्याच प्रथमेश शेरला चा ३५चालीत पराभव केला. दुसऱ्या पटावर राम विशाल परब व अथर्व सोनी यांचा डाव ५५ व्या चाली अखेर फ्रेंच डिफेन्सने बरोबरीत सुटला तिसऱ्या पटावर सहाव्या फेरीत अहमदनगरच्या हॉर्स गाडगे यांनी कोल्हापूरच्या आदित्य सावळकर याचा कारोकान पद्धतीने झालेल्या डावात ३५ चालीत पराभव केला पराभव केला तर जळगावच्या अजय परदेशी याने अधिक मानांकन असलेल्या पुण्याच्या सौरभ महामुनी यास बरोबरीत रोखत आश्चर्याचा धक्का दिला

रविवार (दि.२८) रोजी आजच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सह सचिव अंकुश रक्ताडे यांनी आपली उपस्थिती दिली. स्पर्धेची सातवी फेरी सकाळी साडेआठ वाजता झाली तर अंतिम फेरी दुपारी दीड वाजता सुरुवात होणार आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण आज रविवार (दि.२८) संध्याकाळी सहा वाजता स्पर्धेची आठवी व अंतिम फेरी संपल्यावर लगेचच खानदेश सेंट्रल येथे होणार आहे. पहिल्या चार विजेत्या खेळाडूंची निवड गुडगाव (हरियाणा) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार आहे. स्पर्धेत पंच म्हणून गौरव रे,प्रवीण ठाकरे,अभिजीत जाधव नत्थु सोमवंशी, आकाश धनगर, अरविंद देशपांडे अभिषेक जाधव हे काम बघत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT