जळगाव : जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड / Jalgaon: Jain Irrigation Systems Limited Nashik Latest News
जळगाव

Jalgaon News : जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

उत्पन्न, EBITDA आणि नफ्यात उल्लेखनीय वाढ; मायक्रो इरिगेशन, टिश्यूकल्चर, सौर कृषी पंप विभागात मागणीत वाढ

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड व तिच्या सहयोगी कंपन्यांनी ३० जून २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०२५–२६ च्या पहिल्या तिमाहीचे एकत्रित (Consolidated) आणि स्वतंत्र (Standalone) आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनी मायक्रो इरिगेशन, पीव्हीसी व एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, अ‍ॅग्रो प्रोसेसिंग, सोलर कृषी पंप, टिश्यूकल्चर रोपे, नूतनीकरणीय ऊर्जा व कृषी सेवा क्षेत्रात कार्यरत आहे.

  • एकत्रित उत्पन्न : १,५४६ कोटी (४.६ टक्के वाढ)

  • स्वतंत्र उत्पन्न : ७.३ टक्के वाढ

  • एकत्रित EBITDA : २०२ कोटी (१३ टक्के वाढ)

  • स्वतंत्र EBITDA : १२३ कोटी (१५.५ टक्के वाढ)

  • EBITDA मार्जिन : १३.१ टक्के (९८ बेसिस पॉईंट्सची सुधारणा)

कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन म्हणाले की, “मायक्रो इरिगेशन, टिश्यूकल्चर आणि सौर कृषी पंप क्षेत्रात मागणी वाढत आहे. हायटेक अ‍ॅग्रो डिव्हिजनमध्ये महसूल व नफ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. निर्यात व्यवसायातही समाधानकारक प्रगती होत आहे. आम्ही कामगिरी, नवोन्मेष आणि वित्तीय शिस्त यांचा समतोल राखून सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्यनिर्मिती साध्य करण्यावर भर देत आहोत.”

आव्हाने आणि संधी

  • मे महिन्यात लवकर पावसामुळे पाईप व्यवसायावर परिणाम

  • महाराष्ट्रातील जल जीवन मिशनच्या मंद गतीमुळे दबाव

  • कच्च्या तेलाच्या स्थिर किंमतींमुळे कच्च्या मालाचा खर्च नियंत्रणात

  • चांगला आंबा हंगाम असूनही कमी बाजारभावामुळे महसूल स्थिर

  • भांडवली गुंतवणूक प्रामुख्याने कार्यकारी गरजांवर केंद्रित करते.

  • इन्व्हेंटरी व थकबाकीत किंचित वाढ, परंतु पुढील तिमाहीत सुधारणा अपेक्षित

  • कंपनीचे लक्ष रिटेल व निर्यात व्यवसायावर, ज्यामुळे महसूल व नफ्यात वाढ होण्याची शक्यता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT