जळगाव : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस आणि जिल्हा पोलीस दलाच्या वतीने संयुक्त विद्यमाने मॉक ड्रिल राबविण्यात आली. याप्रसंगी सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडमध्ये असल्याचे दिसून आले.
मॉक ड्रिलदरम्यान बॉम्बसदृश वस्तू आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस, जिल्हा पोलीस दल, बॉम्बशोधक पथक, श्वान पथक आणि शस्त्रधारी जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संशयास्पद वस्तूची तपासणी करून ती निष्प्रभ करण्याचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले. तसेच, रेल्वे स्थानकावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना जेरबंद करण्याची कार्यवाहीही मॉक ड्रिलमध्ये प्रात्यक्षिके करुन दाखवण्यात आली.
Pudhari News Networkजळगाव जिल्हा संवेदनशील असल्याने, तसेच भारत–पाक सीमेवरील तणाव आणि पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही मॉक ड्रिल आयोजित केल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. स्थानकावर मोठ्या प्रमाणात पोलीस व सुरक्षा यंत्रणांची उपस्थिती पाहून नागरिकांमध्ये दहशतवाद्यांबाबत चर्चा रंगल्या होत्या. मात्र, मॉक ड्रिल असल्याचे समजताच त्यांनी दिलासा व्यक्त केला.