जळगाव

Jalgaon News | मतदान कर्तव्यावर असताना ह्रदयविकाराने कर्मचाऱ्याचा मृत्यू

गणेश सोनवणे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा-  जळगाव महानगरपालिकेच्या शाळेतील क्लर्क निवडणूक मतदान बुथवर कर्मचारी म्हणून चाळीसगाव येथे कर्तव्यावर हजर झाले होते. मात्र, (दि. 12) च्या रात्री दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

13 मे रोजी लोकसभेच्या निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभेमध्ये मतदान होणार होते. यासाठी शालेय कर्मचारी शिक्षक व इतर अधिकाऱ्यांच्या निवडणूक विभागाने जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर नेमणूक केली होती. जळगाव मनपाच्या शाळेतील क्लर्क संजय भास्कर चौधरी यांचीही निवडणूक कामे चाळीसगाव येथील तहजीब प्रायमरी उर्दू स्कूल या शाळेतील बुथ क्रमांक 192 वर मतदान कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती. आपल्या बूथ प्रमुख व इतर कर्मचाऱ्यांसह संजय चौधरी ईव्हीएम मशीन घेऊन आपल्या बुथवर हजर झाले होते. रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने सहकार्याने रुग्णालयात नेले. मात्र त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुभाष पाटील हे करीत आहे.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT