ACB Bribe Case Pudhari
जळगाव

मंडळ अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ५० हजारांचा हप्ता घेताना खासगी इसमासह रंगेहात अटक

Jalgaon News | नशिराबादच्या मंडळ अधिकाऱ्याचा पिंप्राळा तलाठी कार्यालयासमोर 'गेम'; तक्रार निकाली काढण्यासाठी मागितली होती लाच

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : तक्रार अर्जाची चौकशी बंद करण्याच्या बदल्यात १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या नशिराबाद मंडळ अधिकारी मिलींद प्रकाश देवरे व खासगी इसम सुरेंद्र प्रल्हाद अहिरे 12 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना या दोघांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. मुख्यतः ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी केली. या कारवाईने जळगाव महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे त्यांच्या शेतात खोदकाम करत असताना स्थानिक रहिवाशांनी त्याविरोधात तहसील कार्यालयात तक्रार केली होती. नंतर ती तक्रार मागेही घेण्यात आली. मात्र, या प्रकरणाची फाईल बंद करण्यासाठी नशिराबाद भाग, जळगावचे मंडळ अधिकारी मिलींद देवरे यांनी तक्रारदाराकडे चक्क १ लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ५० हजार रुपये देण्याचे ठरले.

याबाबत तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे धाव घेतली. त्यानुसार, १२ मे रोजी देवरे याने लाचेची रक्कम खासगी इसम सुरेंद्र अहिरे याच्याकडे देण्यास सांगितले. पिंप्राळा येथील तलाठी कार्यालयासमोर ५० हजार रुपये स्वीकारताना पथकाने झडप घालून आरोपी मिलींद प्रकाश देवरे (वय ३७, मंडळ अधिकारी, वर्ग ३), सुरेंद्र प्रल्हाद अहिरे (वय ३९, खासगी इसम).दोघांना बेड्या ठोकल्या. या निरीक्षक राहुलकुमार नाईक, पोहवा प्रफुल्ल माळी, विलास निकम यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, जळगाव. हे करीत आहे.

जळगाव जिल्ह्यामधील लाज लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदारांनी पाठ फिरवली असून जळगाव विभागापेक्षा त्यांनी धुळे नंदुरबार नाशिक या लाचलित प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी करणे अधिक योग्य असल्याचे समजले आहे जळगाव विभागात गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या कार्यांमध्ये अनेक वेळा विभाग फेल ठरलेला आहे त्यामुळे तक्रारदारांनी आपला मोर्चा जिल्हा बाहेर वळविलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT